Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mohol Politics: मोहोळच्या 22 वर्षांच्या पोरीनं राजन पाटलांना दाखवला घरचा रस्ता; बालेकिल्ल्यात घुसून ‘सिद्धी’नं उधळला विजयाचा गुलाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 December 2025, 13:12

Mohol Politics: सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहोळ आणि राजन पाटील हे नाव गेली अनेक वर्षे एकमेकांशी जोडलेले होते. मोहोळ म्हणजे राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजे मोहोळ असे चित्र तयार झाले होते. मात्र गेल्या एका वर्षात झालेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये राजन पाटील गटाला पराभव स्वीकारावा लागल्याने हे जुने समीकरण आता बदलताना दिसत आहे. आधी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येत राजन पाटील गटाला मोठा धक्का दिला आहे.  Mohol Nagarparishad Election

 

हेही वाचा- अखेर माणिकराव कोकाटे नॉट आऊट! आमदारकी वाचली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. जवळपास 30 वर्षे मोहोळवर प्रभाव असलेल्या राजन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी यश मिळवल्याने राज्यभरात या निकालाची चर्चा सुरू आहे. या पराभवामुळे मोहोळच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.

पूर्वी राजन पाटील यांचे वडील बाबुराव पाटील आणि त्यानंतर स्वतः राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यावर एकहाती वर्चस्व होते. राजन पाटील हे 1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुकांमध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तरीही या मतदारसंघावर पाटील यांचा प्रभाव कायम राहिला.

2009 मध्ये लक्ष्मण ढोबळे, 2014 मध्ये रमेश कदम आणि 2019 मध्ये यशवंत माने हे राजन पाटील समर्थक आमदार निवडून आले होते. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाटील गटाला पहिला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत विरोधकांनी एकजूट दाखवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांना विजयी केले. त्यामुळे राजन पाटील समर्थक यशवंत माने यांचा पराभव झाला.

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटील यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांनी अनोखी रणनीती आखली. आमदार राजू खरे हे शरद पवार गटातून निवडून आले असून, उमेश पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार न देता शिवसेनेचे रमेश बारस्कर यांच्या माध्यमातून पॅनल उभे केले.

मोहोळचं राजकारण बदललं

राजू खरे आणि उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले. या पॅनलने सर्वसामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. तरुण चेहरा आणि एकत्रित विरोधकांची ताकद यामुळे भाजपला मोहोळमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला असून, मोहोळच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Next Post
Urmila Matondkar: Has 'Rangeela Girl' Urmila Matondkar bid farewell to Bollywood? She said...

Urmila Matondkar: 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकरचा बॉलिवूडला रामराम? म्हणाली... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.