Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पळशी येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या बिल मंजूरीसाठी, 25 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रांगेहाथ पकडले; ‘एसीबी’ची कारवाई 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 7 May 2025, 19:22

बारामती, (पुणे) : पळशी (ता. बारामती) येथे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचे उर्वरित बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी (ता. 07) रंगेहाथ पकडले.

 

कांता बापूराव काळाणे (वय -57, पद- ग्रामसेवक, पळशी ग्रामपंचायत कार्यालय ता. बारामती) असे रंगेहाथ पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी एका सरकारी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अधिकृत सरकारी ठेकेदार असून, त्यांनी पळशी येथील सिमेंट बंधाऱ्याचे 16 लाख 46 हजार रुपये किंमतीचे काम पूर्ण केले होते. यापैकी  14 लाख 96 हजार रुपयांचे बिल मंजूर करताना कांता काळाणे यांनी तक्रारदाराकडे 4 टक्के रक्कम म्हणजेच 60 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 30 हजार रक्कम त्यांनी यापूर्वी रोख स्वरूपात स्वीकारली होती.

उर्वरित दीड लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी कांता काळाणे हा 30 हजार रुपयांची वारंवार मागणी करीत होता. त्यामुळे तक्रारदाराने काल मंगळवारी (ता. 06) लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी (ता. 07) लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता कांता काळाणे यांनी तडजोडीअंती 25 हजार रुपये पळशी गावाच्या सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या सापळा कारवाईत त्यांना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.

दरम्यान, याप्रकरणी आरोपी कांता बापूराव काळाणे याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले करीत आहेत.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शितल जानवे पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32
Next Post

मोठी बातमी! रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.