Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gram Panchayat Election 2023 : माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे…अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 5 November 2023, 12:02

Gram Panchayat Election 2023 : पुणे : राज्यात सुमारे २५ हजार जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला राज्यभर सुरुवात झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मातोश्री आशाताई पवार भावूक झाल्या. लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. बारामतीमधील जनताही आमच्यासोबत आहेत. आता माझे वय ८६ वर्षे आहे. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली. अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदान केले. काटेवाडी ग्रामपंचायतीवर अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु या वर्चस्वाला आता सत्तेत एकत्र असलेल्या भाजपकडून आव्हान दिले आहे. परंतु गावातील लोक आपल्यासोबतच आहेत, आमचा विजय निश्चित आहे, असे आशाताई पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. सुरुवातीला काटेवाडी गावात काहीच नव्हते. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. सूनबाईने गावासाठी काम केले. गावात आमचा विजय निश्चित आहे, असे आशाताई पवार यांनी सांगितले.

काटेवाडीत १६ जागांसाठी मतदानाला होत आहे. गावात एकूण ५ हजार जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे. यंदा अजित पवार यांच्या पॅनेलसमोर भाजपने आव्हान उभे केले आहे. आता त्यात कोण बाजी मारणार? हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. सरपंचपदासाठी दोन्ही पक्षाच्या पॅनलमध्ये थेट निवडणूक होत आहे.

 

राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. त्याची नक्की आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूक आजच होणार आहे. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे २५ हजार जागांसाठी रविवारी मतदान होईल. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी होईल. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार आहे.

निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती : २३५३
एकूण जागा : २०,५७२
सरपंचपदे : २३५३
पोटनिवडणुका : ३०८०
संरपंच पोटनिवडणूक : १३०

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Pune Accident News : परिंचे ते सासवड रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार; तिघांची प्रकृती गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp