Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुन्हेगारांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी वकिलांनीच बनवली बनावट जामीनदारांची टीम; पुणे शहर पोलिसांकडून मोठे रॅकेट उद्ध्वस्त

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 February 2025, 15:07
five people arrested for fake surety in pune city

लोणी काळभोर: पुणे जिल्ह्यात वेगवेगळया गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात येत असते. या गुन्हेगारांना जामीनदार होण्यासाठी लोक घाबरतात. त्यामुळे गुन्हेगारांना लायक जामीन मिळत नाही. याचा गैरफायदा घेऊन काही भामट्यांनी न्यायालयातून जामीन मिळवून वकीलांच्या साथीने एक बनावट जामीनदारांचे रॅकेट तयार केले होते. हे रॅकेट गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरुन त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असे. तसेच बनावट जामीनदार व कागदपत्रे तयार करून गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढत होते. मात्र, आता हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वकिलांसह ५ जणांना अटक केल्याची माहिती पुणे शहर पोलीस पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

 

अ‍ॅड. असलम गफुर सय्यद (वय 45, रा. वैदवाडी, हडपसर व अ‍ॅड. योगेश सुरेश जाधव (वय 43, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे आहेत. तर बनावट कागदपत्रे तयार करणारे त्यांचे साथीदार दर्शन अशोक शहा (वय 45 रा. सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे), पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे (वय. 60, रा. भारतमाता चौक, मोशी, ता. हवेली), गोपाळ पुंडलीक कांगणे (वय. 35, रा. मोरवाडी, पिंपरी कोर्टाचे शेजारी, पिंपरी) व संतोषकुमार शंकर तेलंग यांनाही यापूर्वीच अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट बनावट जामीनदारांच्या आधारकार्ड, रेशन कार्ड व ऑनलाईन ७/१२ वरील नावात बदल करून कागदपत्रे तयार करत होते. रेशन कार्ड खरे वाटावे म्हणून त्यावर पुरवठा विभागाच्या उपायुक्तांचा रबरी स्टॅम्प मारुन खोटी सही करीत होते. त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करुन संबंधित कोर्टातील सहाय्यक अधिक्षक (नाझर) यांच्याकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करुन खरे असल्याचे प्रमाणित करायचे. न्यायालयासमोर जामीनदारांना हजर केल्यावर वकील व बनावट जामीनदार हे खरे असल्याचा आव आणत होते. या प्रकारे ते न्यायालयाची दिशाभुल करुन जेलमधील गुन्हेगारांना जामीन मिळवुन देत होते.

दरम्यान, वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीसांना या बनावट जामीनदारांच्या रॅकेटबाबत गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी ही गोपनीय माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांना दिली. त्यानंतर शिंदे यांनी एक पथक तयार करून आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या आदेशानुसार पोलिसांच्या पथकाने लष्कर कोर्टाच्या आवारात सापळा रचून संतोषकुमार शंकर तेलंग, संजय पडवळ, सुभाष कोद्रे, ज्ञानेश्वर शिंदे, सुजित सपकाळ, भोपाळ कांगने, जितेंद्र  या बनावट जामीनदारांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी हा गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला.

या गुन्ह्यातील आरोपींना अटक करुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा दर्शन शहा याच्याकडून बनावट रबरी शिक्के तयार करुन घेत असे. पोलिसांनी शहा याला अटक करत ९ रबरी स्टॅम्प व मशिन जप्त केली. एकेरी पानाचे रेशनकार्ड प्राप्त करुन देणारा पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे व गोपाळ पुंडलीक कांगणे यांना देखील अटक केली आहे. त्यांच्या घराची झडती घेतली असता 89 हजार मुद्देमाल, ९५ संशयित रेशन कार्डसह इतर

या रॅकेटचे मुख्य सुत्रधार अ‍ॅड. असलम सय्यद, अ‍ॅड. योगेश जाधव व आणखी काही जण असल्याची कबुली संतोषकुमार तेलंग याने न्यायालयात दिली आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या बनावट रेशनकार्ड /आधारकार्डद्वारे न्यायालयातून कोणकोणत्या आरोपींना आजपर्यंत जामीन मिळाला व त्यासाठी आरोपीस कोणी मदत केली, इत्यादी माहिती न्यायालयाकडून घेण्यात आली आहे. त्यामध्ये न्यायालयातील काही वकीलांचा व कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी अ‍ॅड. असलम सय्यद, अ‍ॅड. योगेश जाधव यांना अटक केली आहे. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
man arrested for having illegal pistol in shirur Pune

कंबरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.