Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: “हीच आपली लायकी आहे का? कारखाना कोणाचा? ऊस कोणाचा?” दौंडमध्ये अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे आमदार राहुल कुल यांच्यावर हल्लाबोल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 October 2025, 19:16
Daund News: "Is this what we deserve? Whose factory is it? Whose sugarcane is it?" Ajit Pawar indirectly attacks MLA Rahul Kul in Daund

Photo-Social Media

पुणे: दौंड तालुक्यातील (Daund News) शेतकऱ्यांनी कष्टाने (Ajit Pawar) पिकवलेला ऊस (MLA Rahul Kul) हा पुणे जिल्ह्यातील माणूस येऊन गाळप करत आहे, ही आपली लायकी आहे काय? कारखाना कोणी उभारला, कारखाना कोणाचा आणि ऊस कोणाचा, पण गाळप कोण करतंय? तुमच्यात गाळप करण्याची धमक नाही का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी आयोजित जाहीर पक्षप्रवेश व संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात भाजपचे माजी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल शाह, भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोज फडतरे, भाजप नेते नंदू पवार यांच्यासह दौंड शहर आणि तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, दौंड हे महाराष्ट्र आणि भारताला जोडणारे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे दौंडला ‘मिनी भारत’ म्हणून ओळखले जाते. रेल्वेमंत्री वैष्णवी यांची दिल्लीत भेट घेऊन दौंड जंक्शनचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराला जोडणारे रस्ते सुधारले असून, यामुळे येत्या काळात दौंड शहरात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.

पवार पुढे म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानसारखी शैक्षणिक संस्था दौंड शहरापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर उभी केली जाणार असून, दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल. काहीजण म्हणतात, बारामतीचा विकास झाला आणि इतर शहरे भकास आहेत. मात्र हे खरे नाही. मी सर्व भागांना मदत करतो. दौंड शहर आणि तालुक्याला मी मोठा निधी दिला आहे. त्यातून अष्टविनायकसारखा महामार्ग, तसेच दौंड-अहिल्यानगर जोडणारा रस्ता तयार झाला आहे. पीएमआरडीएच्या निधीतूनही दौंड तालुक्याला अनेक योजना मिळाल्या आहेत. मात्र दिलेला निधी योग्यरीत्या वापरला गेला पाहिजे, तरच शहराचा विकास होईल.

पवार म्हणाले, “सकाळी सहा वाजल्यापासून उठून काम करावं लागतं, लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं. दुजाभाव करून चालत नाही, तर योग्य कामाला योग्य ठिकाणी पैसे देण्याची आमची तयारी असते.”

ते पुढे म्हणाले की, आम्ही पुरोगामी विचार मांडणारे लोक आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आम्ही राजकारण करतो. कधीही जातीपातीचे किंवा नातेसंबंधावर आधारित राजकारण केलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच तत्त्वावर आम्ही सर्वांना घेऊन चालतो.

यावेळी अजित पवार यांनी पोलिसांनाही सूचना देत म्हटले की, दौंड पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखावी, चुकीचे गुन्हे दाखल करू नयेत, पण जो दोषी असेल त्याला सोडू नये. निरपराध लोकांना त्रास देऊ नये; कारण फार काळ ते सहन केले जात नाही, हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पवार यांनी पूर्ण ताकद देण्याचे आश्वासन दिले. “उठलो आणि फुफाट्यात बसलो अशी वेळ त्यांच्या वर येऊ देणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वप्निल शहा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1,55,555 रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमास माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर, वैशाली नागवडे, नितीन दोरगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे: दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा पुणे जिल्ह्यातील माणूस येऊन गाळप करत आहे, ही आपली लायकी आहे काय? कारखाना कोणी उभारला, कारखाना कोणाचा आणि ऊस कोणाचा, पण गाळप कोण करतंय? तुमच्यात गाळप करण्याची धमक नाही का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी आयोजित जाहीर पक्षप्रवेश व संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात भाजपचे माजी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल शाह, भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोज फडतरे, भाजप नेते नंदू पवार यांच्यासह दौंड शहर आणि तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, दौंड हे महाराष्ट्र आणि भारताला जोडणारे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे दौंडला ‘मिनी भारत’ म्हणून ओळखले जाते. रेल्वेमंत्री वैष्णवी यांची दिल्लीत भेट घेऊन दौंड जंक्शनचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराला जोडणारे रस्ते सुधारले असून, यामुळे येत्या काळात दौंड शहरात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.

पवार पुढे म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानसारखी शैक्षणिक संस्था दौंड शहरापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर उभी केली जाणार असून, दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल. काहीजण म्हणतात, बारामतीचा विकास झाला आणि इतर शहरे भकास आहेत. मात्र हे खरे नाही. मी सर्व भागांना मदत करतो. दौंड शहर आणि तालुक्याला मी मोठा निधी दिला आहे. त्यातून अष्टविनायकसारखा महामार्ग, तसेच दौंड-अहिल्यानगर जोडणारा रस्ता तयार झाला आहे. पीएमआरडीएच्या निधीतूनही दौंड तालुक्याला अनेक योजना मिळाल्या आहेत. मात्र दिलेला निधी योग्यरीत्या वापरला गेला पाहिजे, तरच शहराचा विकास होईल.

पवार म्हणाले, “सकाळी सहा वाजल्यापासून उठून काम करावं लागतं, लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं. दुजाभाव करून चालत नाही, तर योग्य कामाला योग्य ठिकाणी पैसे देण्याची आमची तयारी असते.”

ते पुढे म्हणाले की, आम्ही पुरोगामी विचार मांडणारे लोक आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आम्ही राजकारण करतो. कधीही जातीपातीचे किंवा नातेसंबंधावर आधारित राजकारण केलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच तत्त्वावर आम्ही सर्वांना घेऊन चालतो.

यावेळी अजित पवार यांनी पोलिसांनाही सूचना देत म्हटले की, दौंड पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखावी, चुकीचे गुन्हे दाखल करू नयेत, पण जो दोषी असेल त्याला सोडू नये. निरपराध लोकांना त्रास देऊ नये; कारण फार काळ ते सहन केले जात नाही, हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पवार यांनी पूर्ण ताकद देण्याचे आश्वासन दिले. “उठलो आणि फुफाट्यात बसलो अशी वेळ त्यांच्या वर येऊ देणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वप्निल शहा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1,55,555 रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमास माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर, वैशाली नागवडे, नितीन दोरगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17
Next Post

दुधाच्या चहाचे दुष्परिणाम महितीयेत? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp