Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : सहलीचा बेत अन् रक्ताचा सडा! पुण्यातून कॅब बुक केली, ताम्हिणी घाटात चालकाचा गळा आवळून खून; पैशांच्या वादातून ३ मित्रांनी संपवला आदित्य भगतचा खेळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 January 2026, 13:29
Crime

photo- ppn

Crime : पुण्यात ऑनलाइन कॅब बुक करून चालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, खूनानंतर कार विकून पुरावे नष्ट करण्याचा कटही पोलिसांनी उधळून लावला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव हद्दीत घडलेल्या या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपीला रेल्वे प्रवासादरम्यान अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Crime)

 

आदित्य गणेश भगत (वय २२, रा. भोसरी) असे खून झालेल्या तरुण कॅब चालकाचे नाव आहे. आदित्य याने ऑनलाइन कॅब बुकिंगद्वारे पुण्यातून प्रवास सुरू केला होता. सहलीसाठी महाबळेश्वरकडे जात असताना पैशाच्या वादातून प्रवासातच तिघा आरोपींनी त्याचा गळा आवळून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. खून केल्यानंतर आरोपींनी ताम्हिणी घाट परिसरात मृतदेह फेकून देत घटनास्थळावरून पलायन केलं.

काही दिवसांनी ताम्हिणी घाटात सणसवाडीच्या हद्दीत मृतदेह आढळून आला. ओळख पटवणं अवघड असतानाच मृताच्या हातातील घड्याळाच्या आधारे पोलिसांना आदित्य भगत याची ओळख पटवण्यात यश आलं. त्यानंतर माणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी कार विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली. पोलिस कर्मचारी प्रीतम निकाळजे यांच्या पथकाने मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील ननावरे पुलाजवळ सापळा रचत अनिकेत वाघमारे याला अटक केली. त्याच्याकडून कार जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने तुषार पाटोळे आणि प्रज्वल उर्फ सोन्या हंबीर यांच्यासोबत खून केल्याची कबुली दिली.

मुख्य आरोपी प्रज्वल हंबीर हा फरार असून सोलापूरहून पुण्याकडे रेल्वेने येत असल्याची माहिती मिळताच पुणे व दौंड लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत इंद्रायणी इंटरसिटी एक्स्प्रेसमधून त्याला अटक केली. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

ही घटना ऑनलाइन कॅब चालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली असून, निष्पाप तरुणाचा जीव केवळ पैशाच्या वादातून गेला, यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post

Pune Crime: पुणे पोलिसांना चकवा देणारी 'पांढरी पिकअप' अखेर जाळ्यात; गाडी उघडताच पोलिसांनाही बसला धक्का, १६ लाखांचं घबाड जप्त!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.