Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यंदा भीमथडी जत्रा २० ते २५ डिसेंबर या कालावधीत रंगणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 December 2024, 16:49
Bhimthadi jatra organized djring 20 to 25 december 2024

पुणे: महाराष्ट्राच्या ग्रामीण कला, संस्कृती आणि टिकाऊ नवोन्मेषाचे अप्रतिम प्रदर्शन म्हणून ओळखला जाणारा आणि गेल्या १८ वर्षांपासून सुरू असलेली भीमथडी जत्रा यंदा २० ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर ग्राउंड, सिंचननगर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठित जत्रा ग्रामीण शिल्पकार, उद्योजक आणि शहरी प्रेक्षकांना एकत्र आणत पारंपरिकता आणि आधुनिकतेचा उत्सव साजरा करेल, असा दावा या भीमथडी जत्रेच्या मुख्य संयोजक सुनंदा पवार यांनी केला आहे.

 

या वर्षीची जत्रा पद्मश्री आप्पासाहेब पवार यांच्या २५ व्या पुण्यतिथीला समर्पित आहे. भारतीय कृषी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आप्पासाहेब पवार यांचा डिप इरिगेशन प्रणालीसारख्या क्रांतिकारी योगदानांसाठी सन्मान केला जाईल, त्यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जत्रेच्या प्रवेशद्वारानंतरचा पहिला विभाग त्यांचा जीवनपट आणि ऐतिहासिक कार्याची माहिती टाइमलाईनच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यासाठी समर्पित केला जाईल. यामुळे जत्रा कृषी नवोन्मेष आणि ग्रामीण प्रगतीशी घट्ट जोडलेली जाणार आहे. भीमथडी जत्रा २०२४ किमान एक लाख पर्यटकांना आकर्षित करेल आणि हे ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे तसेच सांस्कृतिक आदानप्रदानाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनेल.

या वर्षीची प्रमुख आकर्षणे अनेक असल्याचे नमूद करताना पवार म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे विभाग, ज्यामध्ये रेसिड्यू-फ्री उत्पादने प्रमुख असतील. यामुळे या उत्पादनांच्या आरोग्यदायी फायद्यांची आणि टिकाऊपणाची माहिती स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल. यामध्ये जीआय-प्रमाणित उत्पादने, ताजे शेतमाल आणि मध यांचा समावेश असणार आहे. भीमथडी सिलेक्ट विभागात ३० प्रीमियम स्टॉल्स असतील, जे भारतातील १२ वेगवेगळ्या राज्यांमधून असतील. यामध्ये नैतिक रंगांनी तयार केलेली वखे, पारंपरिक कातकिणी तंत्राद्वारे तयार केलेली जीवनशैली उत्पादने यांचा समावेश असेल.

तेलंगणा स्टॉल्स पहिल्यांदाच या वर्षी जत्रेचा भाग असणार आहे. खाद्य विभाग या जत्रेत असणार आहे. ज्यात पर्यटक मालवणी सीफूड थाळी, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रसा आणि उकडीचे मोदक, खापरीवरची पुरणपोळी यासारख्या पारंपरिक महाराष्ट्रातील पदार्थाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. ही जत्रा दि. २० ते २५ डिसेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! पुरंदरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा; पाहा काय आहे प्रकरण? वाचा

Wednesday, 8 April 2026, 14:34
Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20

मोरगावात ज्वेलर्स दुकानावर चोरीचा प्रयत्न; रखवालदाराच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला

Wednesday, 8 April 2026, 14:00
Ashok Kharat

Ashok Kharat Case : आध्यात्मिक जागेवर भोंदूगिरीचा विळखा! तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरात कुटुंबीयांचे कुंपण; नाशिकमध्ये संतापाची लाट

Wednesday, 8 April 2026, 13:20

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

Wednesday, 8 April 2026, 13:06
Next Post

उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत 5 जोडपे विवाहबद्ध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.