उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मोरया चौधरी, तर उपाध्यक्षपदी सोपान दामोदर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरपंच स्नेहल विठ्ठल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताकदिनी महात्मा गांधी तंटामुक्त समितीची फेररचना झाली. यामध्ये नवनियुक्त पदाधिकारी निवडीत अध्यक्षपदी बाळासाहेब चौधरी, तर उपाध्यक्षपदी सोपान चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. कामगारनेते बाळासाहेब चौधरी यांच्या सूचनेनुसार वरील दोघांची नियुक्ती बिनविरोध करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामसभेला उद्योजक बाळासाहेब चौधरी, हवेली बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, युवानेते मनोज चौधरी, माजी उपसरपंच शंकर कड, विजय चौधरी, राजेंद्र चौधरी, संजय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी, ग्रामसेवक संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.







