Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

…अखेर 50 वर्षानंतर भिल्ल समाजाला मिळाले जातीचे दाखले; थेऊर येथील आरोग्यदूत युवराज काकडे यांच्या प्रयत्नांना यश

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 September 2025, 17:17

लोणी काळभोर, ता. 1: शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि पदोन्नतींमध्ये आरक्षण, विविध कल्याणकारी योजनांचा लाभ, आणि इतर सामाजिक व आर्थिक सवलती मिळविण्यासाठी जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना फायदा झाला आहे. मात्र थेऊर (ता. हवेली) येथे गत 50 वर्षापासून वास्तव्यास असलेला भिल्ल समाज हा जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित होता. त्यामुळे त्यांनाही प्रवाहात आणण्यासाठी जातीचा दाखला मिळवून देण्याची गरज होती. अखेर शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्यामुळे भिल्ल समाजाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. असे प्रतिपादन आरोग्यदूत तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पै. युवराज काकडे यांनी केले आहे.

 

थेऊर (ता. हवेली) येथील 100 भिल्ल कुटुंबांना हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याहस्ते रविवारी (ता.31) जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना वरील प्रतिपादन पै. युवराज काकडे यांनी केले. त्यावेळी लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते, थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव, प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, माजी सदस्य विनोद माळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना युवराज काकडे म्हणाले की, भिल्ल समाज गेली अनेक वर्षांपासून थेऊर येथे मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करीत आहे. जातीचे दाखले मिळावेत म्हणून हा समाज अनेक वर्षांपासून झगडत आहे. परंतु, त्यांना नेतृत्त्व नसल्यामुळे दाखले मिळाले नव्हते. सर्व समाजाच्या वतीने जातीचा दाखल मिळावा. म्हणून माझ्याकडे मागणी केली. या मागणीची त्वरित दखल घेतली. आणि या समाजालाही जातीचे दाखले मिळावेत. म्हणून शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यामार्फत प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली. या मागणीची दाखल घेऊन थेऊर येथील 100 आणि नायगाव येथील 100 कुटुंबांना जातीचे दाखले दिले आहे.

जातीचे दाखले मिळाल्यानंतर भिल्ल समाजातील तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तो आनंद पाहिल्यानंतर आपण समाजाच्या हितासाठी एक चांगला उपक्रम राबविल्याचे समाधान झाले. या मिळालेल्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील येणारी पिढी ही, चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन, सुशिक्षित होण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही, या समाजाला मिळणार आहे. तसेच जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके व उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांची बहुमुल्य मदत मिळाली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

दरम्यान, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने व लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांचे समाजाच्या वतीने पारंपरिक वाद्य वाजवत स्वागत करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात नायगाव येथील वास्तव्यास असलेल्या 100 भिल्ल समाजातील कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मिळालेल्या जातीच्या दाखल्यामुळे भिल्ल समाजातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून, आभार मानले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे ते येऊ शकले नाहीत.

यावेळी थेऊरच्या ग्राम महसूल अधिकारी सरला पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर, अरुण संभाजी धारवाड, अमित धुळे, प्रशांत खांडे, सुरज सोनवणे, संग्राम गावडे, विशाल पवार, सलीम शेख, जयदीप दिवेकर, प्रकाश म्हस्के, दिपक शितोळे, रामदास बर्डे, गोवर्धन धारवाड, लहू पवार व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

बनावट पोलिसांकडून वृद्धाची फसवणूक; सोन्याचे दागिने घेऊन पोबारा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.