Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रारुप मतदार यादी जाहीर; पुणे जिल्ह्यात ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदार

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Thursday, 8 August 2024, 11:44

यवत (पुणे) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रावर ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदार आहेत. त्यामध्ये ४४ लाख ३ हजार ३४४ पुरुष, ४० लाख ३५ हजार ६४० महिला आणि ७४५ तृतीयपंथीय मतदार आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

 

या यादीनुसार जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्र आहे. १ लाख ६१ हजार ८९ पुरुष, महिला १ लाख ५३ हजार ७४४ तसेच तृतीयपंथीय ६ असे एकूण ३ लाख १४ हजार ८३९ मतदार आहेत. आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र असून पुरुष मतदार १ लाख ५५ हजार ५५८, महिला १ लाख ४८ हजार ७०० आणि तृतीयपंथीय ८ असे एकूण ३ लाख ४ हजार २६६ मतदार आहेत.

खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लाख ८५ हजार ३५९, महिला १ लाख ७१ हजार ७३४ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख ५७ हजार १०५ मतदार आहेत. शिरूर मतदार संघात ४५७ मतदार केंद्र, पुरुष २ लाख ३२ हजार ६३३, महिला २ लाख १२ हजार ६४६ आणि तृतीयपंथीय २१ असे एकूण ४ लाख ४५ हजार ३०० मतदार आहेत.

दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र, पुरुष संख्या १लाख ५८ हजार ८४०, महिला १ लाख ४८ हजार १९२ आणि तृतीयपंथीय १० असे एकूण ३ लाख ७ हजार ४२ मतदार आहेत.

इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र असून १ लाख ६८ हजार ३६४ पुरुष, १ लाख ५७ हजार १६४ महिला आणि तृतीयपंथीय १२ असे ३ लाख २५ हजार ५४० मतदार आहेत.

बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ८९ हजार ७०१, महिला १ लाख ८१ हजार ८५६ आणि तृतीयपंथीय २० असे ३ लाख ७१ हजार ५७७ मतदार आहेत.

पुरंदर मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख २८ हजार ५७०, महिला २ लाख ७ हजार ८१३ आणि तृतीयपंथीय ३१ असे ४ लाख ३६ हजार ४१४ मतदार आहेत.

भोर मतदार संघात ५६४ मतदान केंद्र, पुरुष २ लाख १९हजार ३३१, महिला १लाख ९३ हजार ७९ आणि तृतीयपंथीय ४ असे ४ लाख १२ हजार ४१४ मतदार आहेत. मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र, पुरुष १लाख ९३ हजार ३७, महिला १ लाख ८२ हजार ७२० आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ७५ हजार ७७० मतदार आहेत.

चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३२ हजार ५९२ पुरुष, २ लाख ९४ हजार ७९७ महिला आणि तृतीयपंथीय ४८ असे ६ लाख २७ हजार ४३७ मतदार आहेत. पिंपरी (अ.जा.) मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ९८ हजार २३८, महिला १ लाख ७८ हजार ९८३ आणि तृतीयपंथीय ३० असे ३ लाख ७७ हजार २५१ मतदार आहेत.

भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख ५ हजार ८५५, महिला २ लाख ५३ हजार ९ आणि तृतीयपंथीय ९५ असे ५ लाख ५८ हजार ९५९ मतदार आहेत. वडगांव शेरी मतदार संघात ४३७ मतदान केंद्रे, पुरुष २लाख ४७ हजार ६३८, महिला २ लाख २८ हजार ८०० आणि तृतीयपंथीय १०० असे एकूण ४ लाख ७६ हजार ५३८ मतदार आहेत.

शिवाजीनगर- २८० मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ४३ हजार ६, महिला १ लाख ३८ हजार ७८३ आणि तृतीयपंथीय ४२ असे २ लाख ८१ हजार ८३१ मतदार, कोथरूड- ३८७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख २० हजार ४०३, महिला २ लाख ६५५ आणि तृतीयपंथीय २१ असे ४ लाख २१ हजार ७९ मतदार आहेत.

खडकवासला मतदार संघात ५०५ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ९० हजार ३४४, महिला २ लाख ५५ हजार ५१० आणि तृतीयपंथीय ३९ असे ५ लाख ४५ हजार ८९३ मतदार, पर्वती मतदार संघात ३४४ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ७६ हजार ४०५, महिला १ लाख ६८ हजार २४२ आणि तृतीयपंथीय ९२ असे एकूण ३ लाख ४४ हजार ७३९ मतदार आहेत.

हडपसर मतदार संघात ५२५ मतदार केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख १२ हजार ३७७, महिला २ लाख ७८ हजार १६३ आणि तृतीयपंथीय ७१ असे ५ लाख ९० हजार ६११ मतदार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) मतदार संघात २७४ मतदान केंद्रे असून यात १ लाख ४५ हजार ९७६ पुरुष, १ लाख ४० हजार ५०७ महिला आणि ३५ तृतीयपंथीय असे २ लाख ८६ हजार ५१८ मतदार आहेत. कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ३८ हजार २८, महिला १ लाख ४० हजार ५४३ आणि तृतीयपंथीय ३५ असे २ लाख ७८ हजार ६०६ मतदार आहेत.

२० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती सादर करावेत

या प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने २० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. यादरम्यान मतदार यादीत नाव नसल्यास नोंदणीसाठी अर्ज नमुना क्रमांक ६, नाव समाविष्ट करण्यास हरकत, यादीत यापूर्वीच समाविष्ट असलेले नाव वगळणे, स्थलांतर झाल्यामुळे नाव वगळणे आदींसाठी नमुना क्र. ७, पत्ता बदल, तपशीलात दुरुस्ती, दुबार इपीक कार्ड मिळणे आदींसाठी नमुना क्र. ८ हे अर्ज ऑनलाईनरित्या भरता येतील. त्याशिवाय संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे आवश्यक पुराव्यांसह अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15
Next Post
two people kidnapped in jalna marathwada

संतापजनक : 'माझ्या मित्रांशी शारीरिक संबंध ठेव' म्हणत नवऱ्यानेच शूट केला आपल्या बायकोचा नको तो व्हिडिओ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.