Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रक चोरणाऱ्या अल्पवयीन चोराचाच अपघातात मृत्यू; तांदळी परिसरातील घटना

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 30 March 2025, 15:26

न्हावरे,ता. 29: तांदळी(ता.शिरूर) येथील परिसरातील कळसकरवाडी येथे कंपनीसमोर माल भरण्यासाठी उभा केलेला ट्रक भरधाव वेगाने चोरून घेऊन जाताना, समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकशी जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अल्पवयीन ट्रक चोर ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी(ता. 28) मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. गौरव अनिल कांबळे(वय-17 वर्षे, रा. शिरसगाव काटा, ता.शिरूर, जि.पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन ट्रक चोराचे नाव आहे. ट्रकमालक संजय मोरे (रा.काष्टी,ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर) यांनी मांडवगण फराटा(ता.शिरूर)येथील पोलिस ठाण्यात दोघा संशयित चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या अपघातात दुसऱ्या ट्रकवरील पांडुरंग सुभाष बडदे हा चालक गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ट्रक चालक व मालक संजय मोरे यांनी गुरुवारी साडेनऊच्या सुमारास स्वतःचा ट्रक तांदळी परिसरातील धनसंजीवनी कंपनीत माल भरण्यासाठी लावला होता. त्यानंतर ते आपल्या जिरेगाव येथील घरी गेले होते. दरम्यान, फिर्यादी संजय मोरे हे झोपेत असताना शुक्रवारी (ता. 28)पहाटे दोनच्या सुमारास अक्षय कळसकर यांनी संजय मोरे यांचा मुलगा अक्षय मोरे याला फोनवरून सांगितले की, तुमच्या ट्रकचा कळसकरवाडी येथे अपघात झाला असून, तुम्ही लवकर या. यावेळी मुलासह त्यांनी कळसकरवाडी येथे जाऊन पाहिले असता कंपनीजवळ एम.एच- 12 ,डब्लू.जे-1444 या ट्रकने तांदळी वरून न्हावरे बाजूकडे जाणाऱ्या एम.एच- 46 ए.आर- 6385 या ट्रकला समोरून जोरदार धडक दिली.

त्यामुळे दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले. एका ट्रक चालकास दौंड येथील पानसरे हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल केले. तसेच चोरी केलेल्या दुसऱ्या ट्रकचा अपघातग्रस्त चालक गौरव कांबळे याला न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्समधून उपचारासाठी पाठवले असता, न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उपचारापूर्वी अल्पवयीन ट्रक चोर मुलगा मयत झाल्याचे घोषित केले.

दरम्यान मोरे यांनी मुलासह कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, गौरव अनिल कांबळे व गणेश कानिफ कदम या दोघांनी ट्रकची चोरी केली असल्याचे त्यांना फुटेजमध्ये दिसून आले. त्यापैकी गणेश कदम हा तेथून निघून गेला होता. मात्र, गौरव कांबळे स्वतः ट्रक चालवत घेऊन जात असताना काष्टी रस्त्यावर कळसकरवाडीजवळ त्याने भरधाव वेगात ट्रक चालवत समोरील येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच दुसऱ्या ट्रकचा चालक पांडुरंग सुभाष बडदे याला किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गौरव अनिल कांबळे व गणेश कानिफ कदम (रा.शिरसगाव काटा,ता.शिरूर, जि.पुणे) या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 
योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘काम रखडतंय, मग व्हिडीओ काढून दबाव कशाला?’ सरकारी कार्यालयांतील वाढत्या व्हिडीओबाजीवर आत्मपरीक्षणाची गरज

Tuesday, 8 September 2026, 16:48

भोर नगरपालिकेचा आठवडे बाजारात ‘प्लास्टिकविरोधी’ धडाका: 20 किलो प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!

Tuesday, 8 September 2026, 16:45

पुण्यात ट्रॅफिकचा कोंडमारा कमी करण्यासाठी मोठा निर्णय; काही मार्ग एकेरी, तर ‘या’ ठिकाणी राईट टर्न बंद

Tuesday, 8 September 2026, 16:21

राधा पाटीलनंतर आता गौतमी पाटील अडचणीत! फ्लाईंग किस देणं पडलं महागात; भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार

Tuesday, 8 September 2026, 16:17

राहुल गांधींना हायकोर्टाचा मोठा धक्का! मोदींवरील वक्तव्याची मानहानी तक्रार रद्द करण्यास स्पष्ट नकार

Tuesday, 8 September 2026, 16:08

भिगवणमध्ये गुटखा विक्रीला उधाण? बंदी असूनही टपऱ्या, हातगाड्या अन् काही दुकानांमध्ये विक्री सुरू असल्याचा आरोप; स्थानिक नेटवर्कच्या चौकशीची नागरिकांची मागणी

Tuesday, 8 September 2026, 15:43
Next Post

सावधान! सर्दी, खोकल्यासाठी खाल्ले जाणारे 103 औषधे निकृष्ट दर्जाची

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp