Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२०० आरोग्य कर्मचारी, ९० डॉक्टर, ४० टॅंकर अन् ३०० पुस्तक स्टॉल; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 15:07

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, अनुयायांसाठी केलेल्या सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन घेतला. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा राहील याची दक्षता घ्यावी, नागरिकांना माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या वेळी दिल्या.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारले आहेत. २० फिरते दूचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहे. खासगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित केल्या आहेत. पुरेशा प्रमाणात औषध साठादेखील ठेवला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे. पाच हिरकणी कक्ष उभारले आहेत. हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिलांना तसेच त्यांच्यासमवेत असलेल्या लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनासाठी खेळणी साहित्य व खाऊ ठेवला आहे. याठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे.

वापराच्या पाण्यासाठी ४० टँकर आणि स्वच्छतेसाठी ४० सक्शनमशीन व १५ जेटींग मशीन ठेवले आहेत. रस्त्यावर कचरा साचू नये यासाठी पाचशे कचराकुंड्या ठेवल्या आहेत. परिसरात विविध ठिकाणी एकूण २ हजार २०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली आहे. स्वच्छतेसाठी २०० सफाई कामगार नियुक्त केले आहेत. कचरा उचलण्यासाठी ८० घंटागाड्या उपलब्ध केल्या आहेत पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवला असून, नागरिकांना सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था (पब्लिक ॲड्रेस सिस्टिम) केली आहे. सीसीटीव्हीद्वारे परिसरावर नजर राहणार असून, त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारला आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे.

 

बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्यावतीने पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारले आहेत. महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.

सह्याद्री वाहिनीवरून १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० वाजता मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल. सकाळी ९.३० वाजता ‘डॉ. बी. आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल, अशी माहिती ‘बार्टी’च्यावतीने देण्यात आली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post
Man dead body found in river at shikrapur pune

chhatrapati Sambhajinagar : ‘मम्मी-पप्पा माफ करा, टेंशन नका घेऊ ' म्हणत, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.