Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची खरेदी-विक्री दस्त नोंदणी सुरु करावी या मागणीसाठी येत्या गुरुवार पासुन पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण, तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे यांची घोषणा….

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 August 2022, 10:01

लोणी काळभोर (पुणे)– हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची खरेदी-विक्री दस्त नोंदणी सुरु करावी या मागणीसाठी येत्या गुरुवार (ता. 25) पासुन पुण्यात विधानभवनासमोर हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केली आहे.

हवेली तालुक्यात ११ गुंठ्यांची खरेदी-विक्री दस्त नोंदणी सुरु करण्याबरोबरच, हवेलीसह संपुर्ण राज्यात मागील सहा महिण्याच्या कालावधीत बेकायदा झालेली दस्त नोंदणी रद्द करुन, बेकायदा दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशीही मागणी तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे यांनी केली आहे.

याबाबत बोलतांना संदीप भोंडवे म्हणाले, मुद्रांक व नोंदणी विभागाने तुकाडाबंदी व तुकडाजोड कायदा १९४७ नुसार राज्यातील ११ गुंठे जमीनीचा तुकडा पाडून विक्री करण्यास अथवा जमिनीची रजेस्ट्री करण्यावर प्रतिबंध घातला आहे. या आदेशावर औरंगाबाद खंडपीठाने मुद्रांक व नोंदणी विभागाचा परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही फक्त हवेली तालुका वगळून सर्वत्र ११ गुंठे क्षेत्राचे खरेदी खते सुरू आहेत. एकापेक्षा जास्त व्यक्तीच्या नावावर शेत जमिनीचे ११ गुंठ्याचे क्षेत्र नोंदणी करण्यास फक्त हवेली तालुक्यातच मनाई केली आहे.

 

पण औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेत जमिनीच्या ११ गुंठ्यांचे खरेदीदस्त नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. औरंगाबाद खंडपीठाने परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय देऊन २०२२ पासून हवेली तालुक्यातील शेत जमिनीचे ११ गुंठ्याचे खरेदी दस्त नोंदणी अजूनही बंद आहेत ही बाब अतिशय चुकीची व हवेली तालुक्यावर अन्याय करणारी आहे.

भोंडवे पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यात व पुणे जिल्ह्यात एकच कायदा असतांनाही, हवेली तालुक्यात मात्र ११ गुंठे जमीनींची खरेदी खते थांबविण्यात आली आहेत. हवेली तालुक्यातील भूमिपूत्रांवर अन्याय होत आहे. गुंठ्यात शेतजमीन विकून मालमत्ता विक्रीचे सर्व व्यवहार बंद असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना ११ गुंठे पेक्षा अधिक जमीन क्षेत्र खरेदी व विक्री करणे भाग पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याचा धोका अधिक बनला आहे. परंतु जिल्ह्यात इतर तालुक्यांत तुकडा बंदी हा कायदा लागू नसल्याने जिल्ह्यात व राज्यात ११ गुंठे जमीनीची खरेदी व नोंदणी सुरू आहे.

संदीप भोंडवे पुढे म्हणाले, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ८६७ गावे पीएमआरडी मध्ये समाविष्ट झालेली आहेत. हवेली तालुक्यातील ६० ते ७० गावे पीएमआरडीएत सामाविष्ठ आहे. मात्र हवेलीतच हा नियम लागू का केला आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. वास्तविक पुणे शहरातील अथवा शहरात असलेल्या बांधकाम व्यवसायिकांशी हात मिळवणी करून त्यांच्या हितासाठी हवेली तालुक्यामधील ११ गुंठे क्षेत्रफळाची खरेदी दस्त नोंदणी बंद केलेली आहे. असं भासवून गुपचूप खरेदीदस्त नोंदवून मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा जमा करण्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोपही भोंडवे यांनी केला आहे.
अन्यथा हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांची मुले देशोधडीला लागतील..

याबाबत बोलतांना संदीप भोंडवे म्हणाले, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो मुलांनी प्लॉटिंग हा चांगला व्यवसाय असल्याने, प्लॉटिंगमध्ये कोट्यावधी रुपये गुंतवलेले आहेत. मात्र शासनाने हवेली तालुक्यात ११ गुंठे जमीनींची खरेदी खते थांबविल्याने, तालुक्यातील तरुण देशोधडीला लागण्याच्या मार्गावरआहेत. शेतकऱ्यांची मुले व्यवसाय धंद्यात उतरत असतील तर, त्यांना शासनाने अशा पध्दतीने आडकाठी आणने चुकीचे आहे. येत्या गुरुवार पासुन बेमुदत उपोषन सुरु करीत आहेत. त्यानंतरही शासणाने दखल न घेतल्यास, पुढील आंदोलनअधिकच उग्र करण्यात येईल असेही भोंडवे यांनी यावेळी स्पष्ठ केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

कर्मचारी निवड आयोग : उपनिरीक्षक, स्टेनोग्राफर पदांची भरती सुरू ; 4300+ रिक्त पदे 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.