Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवनिर्वाचीत “सरपंच” चित्तरंजन गायकवाड यांची राज्यात अशीही “रेकॉर्ड” ब्रेक कामगीरी, थेट जनतेतुन सरपंचपदाच्या निवडणुकीत पत्नी पाठोपाठ पतीचीही बाजी, जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण राज्यातील पहिलीच घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 December 2022, 15:32

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या “सरपंच” पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी अडीच हजाराहुन अधिक मतांनी विजय मिळवला आहे. ग्रामपंचायतीच्या पाच वर्षापुर्वींच्या निवडणुकीत, चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड याही थेट जनतेतुन मोठ्या मताधिक्कयाने विजयी झाल्या होत्या. सरपंच पदाच्या निवडणुकीत थेट जनतेतुन पत्नीपाठोपाठ पती विजयी होण्याची केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण राज्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. यामुळे नवनिर्वाचीत “सरपंच” चित्तरंजन गायकवाड यांनी राज्यात रेकॉर्डब्रेक कामगीरी केल्याची चर्चा आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १८) झालेल्या निवडणुकीत १२८४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी चित्तरंजन गायकवाड यांनी ७६२५ मते घेत, जनसेवा पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार व विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी, कल्पना काळभोर (५१०५) यांचा तब्बल २५२० मतांनी पराभाव केला आहे. तर ग्रामपंचायतीच्या सतरा जागांच्यासाठी निवडणुक पार पडली होती. यातही चित्तरंजन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील नवपरीवर्तन पॅनेलने सतरापैकी सोळा जागा त्याही मोठ्या फरकाने जिंकत कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डब्रेक कामगीरी केली आहे. चित्तरंजन गायकवाड यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जनसेवा पॅनेलला अवघ्या एका जागेवर समाधान माणावे लागले आहे. जनसेवा पॅनेलचे प्रमुख नंदकुमार काळभोर हे स्वतः या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

दरम्यान कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी थेट जनतेतुन मतदान झाले. यात चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांना सहा प्रभागातुन ( १५५५ + ६१९ + ६७६ + ९२५ + १६७७ + २१७३) ७६२५ एवढी मते मिळाली. तर चित्तरंजन गायकवाड यांच्या विरोधात सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कल्पना काळभोर यांना सहा प्रभागातुन मिळुन (८२६ + ७८५ + ४२२ + ९१२ + ११५० + १०१०) ५१०५ मते मिळाली. यामुळे चित्तरंजन गायकवाड यांचा तब्बल २५२० मतांनी विजयी झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

 

दरम्यान चित्तरंजन गायकवाड यांच्या विजयाची कारणे….

चित्तरंजन गायकवाड यांचे एकखांबी, निर्णायक नेतृत्वामुळे हे निर्विवाद विजयी वर्चस्व स्थापन करता आले. वेळप्रसंगी आक्रमक, संयमी, सर्वसामान्यांना ऑनलाईन व ऑफलाईन, २४ तास सहज उपलब्ध होणा-या नेतृत्वाखालील नवपरिवर्तन पॅनेलने या निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी केली. तसेच चित्तरंजन गायकवाड यांनी मिळवलेला विजय व त्यांना मिळालेली मते पहाता, चित्तरंजन गायकवाड यांनी मागील पाच वर्षात केलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे, निवडणूकीचे गेली पाच वर्षे चाललेले उत्कृष्ट नियोजन व विरोधकांच्या प्रश्नांना दिलेली सडेतोड, बिनजोड उत्तरे या सर्वांचा परिपाक म्हणजेच आजचा निवडणूक निकाल आहे. निकाला नंतर “हा निकाल अपेक्षितच होता” अशी प्रतिक्रिया मतदारांच्या बरोबर सर्वसामान्य नागरीकांच्यात उमटली आहे.

प्रभागनिहाय उमेदवारांची नावे (कंसात मिळालेली मते व विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे)

प्रभाग क्रमांक १ – नवपरीवर्तन प्रनेल- आकाश धनंजय काळभोर (१३८१ विजयी ), सिमिता अंगदराव लोंढे (१३८५ विजयी ) व कोमल सुहास काळभोर (१५२९ विजयी), विशाल विठ्ठल गुजर (१००२ पराभुत), नेहा बाबासाहेब चव्हाण (९५९ पराभुत), अर्चना हेमंत टिळेकर (८२९ पराभुत)

प्रभाग क्रमांक २ – नवपरिवर्तन पॅनल – बिना तुषार काळभोर (७८८ -विजयी), मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे (८२४ -विजयी), राजश्री उदय काळभोर (७१०-विजयी), जनसेवा पॅनेल – रेश्मा नंदकुमार काळभोर (६१२), शीतल नितेश लोखंडे (६६४), स्मिता निलेश काळभोर (६८२)

प्रभाग क्रमांक ३ – नवपरिवर्तन पॅनल – दीपक नवनाथ अढाळे (६६९ -विजयी ), सुनंदा देविदास काळभोर (७०९-विजयी, जनसेवा पॅनेल – शहाजी कांतीलाल मिसाळ (४२१), संगीता राजाराम दळवी (३९०)

प्रभाग क्रमांक ४ – नवपरिवर्तन पॅनल- रुपाली सतीश काळभोर (१०४५ -विजयी), नासीरखान मनुलाखान पठाण (९६२ -विजयी), अभिजित रामदास बडदे (९५९), जनसेवा पॅनेल – नंदू कैलास काळभोर (१०८५ -विजयी), बिस्मिला शमी शेख (७३३), दत्तात्रय भिमराव वाघमारे (६७४)

प्रभाग क्रमांक ५ – नवपरिवर्तन पॅनल -स्वप्नील शिवाजी कदम (१५१७ -विजयी), अविनाश विजय बडदे (१४९८-विजयी), सोनाबाई अशोक शिंदे (१४४६ -विजयी), जनसेवा पॅनेल -स्मिता गुरुदत्त काळभोर (१३५४), मयूर सुरेश कदम (१३७०), अमित वसंत कदम (१२६२)

प्रभाग क्रमांक ६ – नवपरिवर्तन पॅनल – योगेश भाऊराव मिसाळ (१८१६-विजयी), सलीमा कलंदर पठाण (१८५१-विजयी), राणी प्रितम गायकवाड (१८९५-विजयी), जनसेवा पॅनेल – श्रीकांत नारायण भिसे (८२८),अर्चना श्रीकांत कदम (१२८६),मनीषा राजेश काळभोर (१२६१), स्वतंत्र – रुपाली अविनाश कोरे (४३०)

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

पीएमपीतून प्रवास करणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला ; हडपसर येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.