मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील तब्बल 226 नगर परिषदा आणि 38 नगर पंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका अखेर घेण्यात आल्या असून सकाळी 7:30 वाजता ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

या निवडणुकीमध्ये 264 पालिका अध्यक्षपदांसाठी आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोणत्याही अनुचित प्रकारांना रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निवडणुकांसंदर्भात काही उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अपीलांमुळे निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यात आला. परिणामी, 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारात उत्सुकता पाहायला मिळत आहे.






