Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूज नगरीत भाजपच्या काही आजी माजी नगरसेवकांनाच डेंग्यूची लागण…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 July 2022, 14:53

अजित जगताप

वडूज : खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला आहे. याला सहा वर्षे होतील पण, नागरी सुविधा उपलब्ध करण्यास अपयश आले असतानाच आजी माजी नगरसेवकांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. आता तरी लक्ष केंद्रित करा अशी म्हणायची पाळी वडूज येथील सामान्य नागरिकांवर आली आहे.

सात महिन्यांपूर्वी वडूज नगरीची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांनी मोट बांधली, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. अपक्ष नगरसेवकांना राष्ट्रवादीमय करून नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष पद बहाल केले. या गोष्टीला सात महिने झाले आहेत. सत्तेचा रिमोट कॅट्रोल ठेवण्यात आला आहे. पण, विकास कामे ठप्प झाली आहेत. युगपुरुषांची नावे काही भागाला दिली आहेत, तिथे रस्त्यावर चिखल साचला असूनही दुर्लक्ष केले गेले. आता तर आजी माजी नगरसेवकांना घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यू साथीने खाजगी रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे.

एक आठवड्यापुर्वी वडूज नगरीत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी मुरूम टाकण्याचा ठेका दिला.रॉयल्टी चलन भरले.पण, अद्याप ही पेडगाव रस्त्यावरील कर्मवीर नगर मुरमापासून उपेक्षित ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात चिखल साचल्याने ये-जा करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या आजी माजी नगरसेवकांना डेंग्यू झाल्याने सतरा प्रभागातील काही नागरिक हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वडूज नगर पंचायत मुख्यधिकारी रजेवर गेल्याने आता तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न करदाते नागरिकांना पडला होता.

 

त्यातच भाजपचे प्रचारकच रक्त तपासणी करून डेंग्यू झाला नाही ना? याची लॅब मध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. तर इतर नगरसेवक हे काही ठराविक प्रभागात फिरकतच नाहीत. अशा तक्रारी नागरिक करीत आहेत.  त्यासाठी आंदोलन करण्याची गरज असली तरी कोण पुढाकार घेणार? या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने वडूज नगरीचा कारभार लवकरच सुधारेल अशी भाबडी आशा अनेकांना वाटत आहे.दरम्यान, भाजपने विरोधी पक्षाची भूमिका मांडून प्रशासनाचे  लक्ष वेधून घेतले पाहिजे अशी मागणी होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

सेवा रस्त्यावरील तुटलेल्या गटारांवरील झाकणांची दुरुस्ती करण्यास रस्ते महामार्ग विकास प्राधिकरणकडून सुरुवात ; भिगवणकरांची असह्य त्रासातून मुक्तता..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp