बिहार: गेल्या काही वर्षांत (Viral Video) सोशल मीडियावर लाइक्स आणि (Trending Viral Video) व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार वाढले आहे. फक्त प्रसिद्धी किंवा हिरोगिरीसाठी अनेकजण जीव धोक्यात घालून असे प्रकार करताना आपल्याला दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात एका तरुणाने चालू ट्रकखालून बाईक काढण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. हा प्रकार पाहून या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (Breaking News)

व्हिडिओमध्ये रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसते. ट्रक, चारचाकी वाहने आणि इतर गाड्याही एका जागी थांबलेल्या आहेत. या गर्दीत एक बाईकस्वार ट्रकखालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. घाई-गडबडीत त्याने बाईक सरळ ट्रकखाली घातली. मात्र बाईक पुढे नेताना तो अडकला आणि बाहेर येण्यासाठी त्याला धडपड करावी लागली. शेवटी कसाबसा ट्रकखालून तो बाहेर आला, पण त्याचा हा हलगर्जीपणा पाहून अनेकजणांना या प्रकारची भीती वाटली. ट्रकचालकाने त्यावेळी ट्रक हलवली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sanki_kemar या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हा स्टंट अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितलं आहे. एका नेटकऱ्याने तरुणाच्या बाईकवर प्रेस असा शब्द लिहिलेला असल्याने टीका करत, पत्रकार असूनही एवढी मोठी बेपर्वाही, लोक काय शिकणार, अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने नशीब साथ देत होतं होते म्हणून वाचला, नाहीतर फोटोवर हार चढला असता, अशी प्रतिक्रिया दिली.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याचे काय परिणाम होऊ शकतात, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.







