Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओ यो मध्ये अविवाहित जोडप्यांना प्रवेश बंदी! ‘या’ शहरामध्ये नवा नियम लागू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 6 January 2025, 13:28

उत्तरप्रदेश: भारतामध्ये कोणत्याही शहरामध्ये चांगल्या दर्जाचे हॉटेल्स शोधण्यासाठी ओ यो कंपनी लोकप्रिय आहे. भारतात   ओ यो हॉटेल्सची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. आजकाल ओ यो हॉटेल्स लहान शहरांपासून ते महानगरीय शहरांपर्यंत पहायला मिळत आहेत. परंतु, आता ओ यो या कंपनीनं त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यापुढे अविवाहित जोडप्यांना ओ यो हॉटेल्समध्ये प्रवेश दिला जाणार नाही. आतापर्यंत अनेक अविवाहित जोडप्यांना तात्काळ खोलीची नोंदणी करता येत होती. परंतु कंपनीच्या नव्या नियमांमुळे आता अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

 

उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरामधून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यानंतर हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे. परंतु, ओ यो कंपनीने हा निर्णय नेमका का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.ओ यकंपनीच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर सुद्धा अनेक मिम्स व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. नियमांमध्ये केलेल्या बदलामुळे ओ यो स्वत:ची ओळख बदलण्याचा प्रयत्न करत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंपनीचं म्हणणं काय आहे?

ओ यो कंपनीचे उत्तर भारतीय क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की, लोकांना जबाबदार आणि सुरक्षित आदरतिथ्याची सेवा देण्यास ओ यो कटिबद्ध आहे. आम्ही लोकांच्या वयैक्तिक स्वातंत्राचा आदर करतो. परंतू, ज्या प्रदेशामध्ये आमचा व्यावसाय सुरु आहे, त्या प्रदेशातील कायद्याचे पालन करणे आणि नागरी संघटनांना सहकार्य करणे ही देखील आमची जबाबदारी आहे. या बदलानंतर देखील आमची कंपनी वेळोवेळी या धोरणांचा आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेत राहाणार आहे.

आता बुकिंगसाठी लग्नाचा पुरावा आवश्यक

पीटिआयच्या रिपोर्टनुसार, ओ यो ने अविवाहित जोडप्यांना हॉटेल बुकिंगवर सरसकट बंदी घातली आहे. जर वापरकर्त्यांना या पुढे ओ यो हॉटेलमध्ये बुकिंग करायची असेल तर त्यांना लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. हा नियम सध्या ऑनलाईन बुकिंगसाठी लागू करण्यात आला आहे. हा नियम तात्काळ लागू करावा, असे निर्देश ओ यो कंपनीने मेरठमधील सगळ्या हॉटेल्सला दिले आहेत.

ओ यो या नियमांना अंमलात का आणतीये?

ओ यो कंपनीने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगण्यात येत आहे. या नियमांच्या माध्यमातून ओ यो हॉटेल्स कुटुंब, व्यावसायीक प्रवासी, विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करत आहे. नियमातील या बदलांमुळे ग्राहकांनी ओ यो मध्ये अधिक दिवस राहावे आणि पुन्हा बुकिंग करावे यासाठी प्रयत्न केला जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post
Action against fake application in crop insurance says Agriculture minister

पीकविमा योजनेतील बनावट अर्जदारांवर कारवाई करू : कृषिमंत्री, धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील प्रकरणे तपासणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.