Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RSS संघाच्या सदस्यांकडून होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणानी उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 12 October 2025, 16:37
Tired of sexual harassment by RSS members, a young software engineer took an extreme step

Photo-Social Media

तिरूवनंतपुरम : केरळच्या थंपानूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आनंदू अजी या तरुणानं लॉजमध्ये आत्महत्या केली. आनंदू हा कोट्टायम जिल्ह्यातील थंपलाकड भागातील रहिवासी होता. गेल्या काही दिवसांपासून तो तीव्र मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानं आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांकडून झालेल्या लैंगिक छळामुळे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं नमूद केलं आहे.

ही घटना गुरुवारी उघडकीस आली. आनंदू थंपानूरमधील एका लॉजमध्ये राहत होता. बराच वेळ तो बाहेर न आल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी लॉज मालकाला माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, आनंदू लटकलेल्या अवस्थेत आढळला.

आत्महत्येपूर्वी आनंदूने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेड्यूल केली होती, जी त्याच्या मृत्यूनंतर स्वयंचलितपणे प्रसिद्ध झाली. त्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं “मी दीर्घकाळ डिप्रेशनशी झुंज दिली. आता जीवन संपवण्याचा निर्णय घेतो आहे. माझ्या मृत्यूला कोणतीही मुलगी, प्रेमकहाणी किंवा कर्ज कारणीभूत नाही. माझ्या बालपणी झालेल्या लैंगिक छळामुळे निर्माण झालेल्या मानसिक आजारामुळे मी हे पाऊल उचलतोय.”

आनंदूने आपल्या 15 पानी पत्रात बालपणी RSS शिबिरांमध्ये झालेल्या शारीरिक आणि लैंगिक छळाचे तपशील दिले आहेत. “मी बालपणी RSS संघात सामील झालो. तिथल्या सदस्यांनी माझ्यावर वारंवार शारीरिक आणि लैंगिक छळ केला. मला त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, पण त्यांनी शिबिरांमध्ये माझ्यावर अमानुष वागणूक दिली,” असं आनंदूने लिहिलं. त्यानं पुढे सांगितलं की, “RSS सदस्यांपासून सावध राहा. ते नातेवाईक, वडील, भाऊ किंवा मित्र असले तरी, अशा लोकांना आपल्या जीवनातून दूर ठेवा. हे लोक अत्यंत विषारी आहेत.”

 

त्याने आपल्या पत्रात पुढे नमूद केलं की, “RSS शिबिरांमध्ये माझ्यासारख्या अनेक मुलांना शारीरिक आणि लैंगिक छळ सहन करावा लागला. मी आता संघातून बाहेर पडलोय, म्हणून हे सगळं उघडपणे सांगत आहे.”

या प्रकरणावर DYFI केरळ स्टेट कमिटीचे उपाध्यक्ष व्ही. के. सनोज यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “आनंदूच्या मृत्यूने RSSचं अमानवी रूप समोर आलं आहे. त्याच्या शेवटच्या शब्दांमधून या संस्थेची विचारसरणी किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होतं. समाजाने अशी विषारी मानसिकता पूर्णपणे नाकारली पाहिजे.” सध्या पोलिसांकडून आनंदूच्या आत्महत्येचा आणि त्यानं केलेल्या आरोपांचा तपास सुरू असून, त्याच्या पत्रातील माहितीची पडताळणी केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06

पुण्यात भुतबाधेच्या नावाखाली तृतीयपंथी महिलेचे कपडे काढले; खिडकीला बांधून मिरचीची धुरा देत मारहाण; तृतीयपंथी गुरुसह चौघांवर गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 19:53

‘थांब तुझ्या नवऱ्याला आपले फोटो पाठवतो’ विवाहितेचे ७०हुन अधिक अश्लील व्हिडिओ काढले; मैत्रीचा गैरफायदा घेत संबंध ठेवले अन् नकार देताच..

Tuesday, 6 October 2026, 19:44
Next Post
Purandar Airport: “Do not purchase land in the Purandar Airport area of ​​Pune, otherwise…” Revenue Minister’s big statement; What exactly did Bawankule say?

Purandar Airport: “पुण्यातील पुरंदर विमानतळ परिसरात जमिनी खरेदी करू नका, अन्यथा….” महसूलमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; नक्की काय म्हणाले बावनकुळे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp