तेलंगणा (Telangana crime news): तेलंगणामधील शासकीय बाल सुधारगृहात 10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथील बाल सुधारगृहाच्या पर्यवेक्षकांनेच या मुलावर अत्याचार केला. याप्रकरणी आत संबंधित पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना हैद्राबादच्या सईदाबाद परिसरातील बाल सुधारगृहात घडली. येथे एक 10 वर्षाचा मुलगा शासकीय बाल सुधार गृहात होता. त्यानंतर तो सुट्टीच्या काळात घरी गेला होता. तेंव्हा त्याच्या वर्तनात बदल जाणवून आला. तो शांत राहत असल्याने व कोणाशी काही बोलत नसल्याने या सगळ्यातून त्याच्यासोबत काहीतरी वाईट झालं असाव अशी त्याच्या आईला शंका आली.
त्यानंतर मुलाच्या आईने त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सर्व हकीकत सांगितली. घडलेला प्रकार ऐकून पालकांना धक्काच बसला. त्यानंतर ताबडतोब पोलिस स्टेशन गाठत पिडीत मुलाच्या आईने तक्रार दाखल केली. आईच्या तक्रारीवरून, सैदाबाद पोलिसांनी 11 ऑक्टोबर रोजी आरोपी पर्यवेक्षकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मे महिन्यापासून आरोपी पर्यवेक्षक मुलावर अत्याचार करत होता. पिडीत मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.







