Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जमीन मालक आता व्यवहार रद्द करू शकणार नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल; वाचा सविस्तर

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 22 December 2025, 8:49

मुंबई: जमीन खरेदी आणि विक्रीच्या (Property News) व्यवहारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला असून यामुळे अनेक खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीच्या व्यवहारात ठरलेल्या वेळेत पैसे भरण्यास थोडा उशीर झाला, तर तो करार किंवा न्यायालयाचा आदेश लगेच रद्द करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून, खरेदीदाराची व्यवहार पूर्ण करण्याची इच्छा आणि त्याचे प्रयत्न पाहणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या निकालाचा परिणाम देशभरातील जमिनीशी संबंधित अनेक जुन्या प्रकरणांवर होऊ शकतो.

 

या जुन्या प्रकरणावर नजर टाकली तर, 2004 साली एका जमिनीचा व्यवहार साधारण 9.05 लाख रुपयांना निश्चित करण्यात आला होता. खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील मतभेदांमुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सुमारे 7 वर्षे हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात चालल्यानंतर 2011 मध्ये खरेदीदाराच्या बाजूने निकाल लागला. कोर्टाने उरलेली रक्कम दोन महिन्यांत भरून व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र जमीन मालकाने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि तिथे सुनावणी होण्यास 2016 साल उजाडले. उच्च न्यायालयाने कनिष्ठ कोर्टाचा आदेश कायम ठेवला, परंतु ठरलेल्या मुदतीत पैसे न आल्याचे कारण देत जमीन मालकाने हा व्यवहार रद्द करण्याची मागणी लावून धरली होती.

सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, जर खरेदीदार सुरुवातीपासून व्यवहार पूर्ण करण्यासाठी तयार असेल आणि त्याने तसे प्रयत्न केले असतील, तर केवळ तांत्रिक कारणांमुळे त्याच्यावर अन्याय करणे योग्य नाही. जेव्हा एखादे मोठे न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवते, तेव्हा मूळ आदेशाचे महत्त्व वाढते. केवळ मुदतीचे तंतोतंत पालन झाले नाही म्हणून पूर्ण निकाल बाद ठरवता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला या व्यवहाराची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रामाणिक खरेदीदारांचे हित जपले गेले असून भविष्यातील जमीन व्यवहारांसाठी हा एक मोठा आधार ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

पुणेकरांनो तुमच्या बंद घरांवर 'यांची' नजर; वेळीच सावध व्हा अन्यथा होईल मोठे नुकसान; वाचा सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.