Navneet Rana News: भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून एक अत्यंत वादग्रस्त विधान केले असून त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी एका समुदायाचा उल्लेख करत हिंदूंना अधिक मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले.

त्या म्हणाल्या की जर समोरचे लोक १९ मुले जन्माला घालत असतील, तर आपण आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी किमान ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राणा यांनी पुढे असा दावा केला की, जर काही लोक म्हणतात की ‘आज हिंदूंचे घर उद्या आमचे असेल’, तर अशा विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
राणा यांनी एका मौलानाचा दाखला देत सांगितले की, काही लोक विशिष्ट हेतूने लोकसंख्या वाढवत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी मागे राहून चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. लोकसंख्या वाढीचा समतोल राखण्यासाठी हिंदूंनी आता सावध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. नवनीत राणा यांच्या समर्थकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.






