Imran Khan Death : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर इम्रान खान यांच्या मृत्यूची माहिती जोरात फिरत आहेत. मात्र ही माहिती खरी आहे की अफवा हे अजून तरी समोर आलेल नाही. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या या बातम्यांमध्ये तर पाकिस्तानी लष्कराने त्यांना विष देऊन मारल्याचा दावा केला जात आहे. या अफवांमुळे पाकिस्तानमध्ये एकच गोंधळ उडालेला दिसतो. त्यातच इम्रान खान यांच्या बहिणींनाही त्यांची भेट घेऊ दिली जात नसल्याने लोकांच्या शंका आणखी वाढल्या आहेत. इम्रान खान हे पीटीआय (PTI) पक्षाचे संस्थापक असून 2023 पासून रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात आहेत.

पीटीआयचा आरोप आहे की गेल्या अनेक आठवड्यांपासून इम्रान खान यांना कुणालाही भेटू दिली जात नाही. आता कुटुंबीयांनाही भेट नाकारली जात असल्याने परिस्थिती अधिकच तंग झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये “नेमकं काय सुरू आहे?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. Imran Khan Death
दरम्यान, इम्रान खान यांच्या बहिणींवरही पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या तुरुंगाबाहेर शांतपणे आंदोलन करत बसल्या असताना अचानक दिवे बंद करून पोलिसांनी त्यांच्या वर हल्ला केला, असे नुरीन नियाझी यांनी सांगितले. Imran Khan Death 71 वर्षांच्या नुरीन यांना केसांना धरून ओढत नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे. इतर महिला आंदोलनकर्त्यांनाही मारहाण झाल्याचे पीटीआयचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर इम्रान खान यांच्या बहिणींनी पंजाब पोलिस प्रमुखांना पत्र पाठवून संबंधित अधिकारी व पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस अत्याचार वाढत चालल्याचा आरोप त्यांनी केला.
Reports are now surfacing from inside the prisons of PUnjabi Pakistan that Imran Khan, who was being held in custody, has been killed by Asim Munir and his ISI administration according to several news outlets. If this information is confirmed to be true, it marks the absolute end… pic.twitter.com/SbbVB5uJll
— Ministry of Foreign Affairs Baluchistan (@BaluchistanMFA) November 26, 2025
याशिवाय, गेल्या महिनाभरात इम्रान खान यांना कोणत्याही भेटीची परवानगी दिली गेली नाही, असेही पक्षाकडून सांगितले जात आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी हेही सात वेळा भेटीचा प्रयत्न करूनही आत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे इम्रान खान यांच्या तब्येतीबद्दल आणि तुरुंगातील स्थितीबद्दल प्रश्न आणखी गंभीर बनले आहेत.







