Bangladesh Sheikh Hasina : बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना खून आणि कट रचण्याच्या गंभीर आरोपात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या एका न्यायालयाने (Former Bangladesh Prime Minister Sheikh Hasina sentenced to death) ही शिक्षा सुनावली आहे. 2024 साली बांगलादेशमध्ये झालेल्या एका हिंसक आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल आज लागला. त्यात न्यायालायने धक्कादायक निकाल दिला आहे.

2024 मध्ये झालेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर होते. शेख हसीना यांनी मात्र हे आरोप वेळोवेळी फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा: महाराष्ट्र हादरलं! तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार, अमानुष मारहाण करून केली हत्या
दरम्यान, या आंदोलनानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं सरकार सत्तेत आलं होत. बांगलादेशमध्ये सरकारविरुद्ध झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेवरुन शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचा आरोप करीत खटला दाखल करण्यात आला होता. आता याचं खटल्यात हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरनाकडून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.






