Crime News : देशभरात सध्या गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. बिहारमधून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आलीये. नवऱ्याने बायकोची कैचीने हत्या केल्याच्या घटना घडली आहे.

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील बघौनी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या बायकोवर संशय घेत तिची कैचीने निर्घृण हत्या केली आहे. मृत महिलेचे नाव सुमित्रा देवी (27) असं आहे. तर लालबाबू असं आरोपी पतीचं नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ‘आरोपी लालबाबू दास आणि सुमित्रा देवी यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दोघांना 3 वर्षांची एक मुलगी आहे. लालबाबू दिल्लीला राहायचा. काही दिवसांपूर्वी त्याला पत्नीच्या अफेअरबाबत माहिती मिळाली होती. यानंतर तो दिल्लीहून आपल्या घरी आला आणि बायकोची हत्या केली.
लालबाबू दासची पत्नी ही पतीचं घर सोडून 15 दिवस तिच्या प्रियकरासोबत राहत होती. यानंतर पत्नी घरी आल्याचं पती लालबाबू दासला कळलं आणि तोही दिल्लीहून घरी परत आला. त्यानंतर त्याने पत्नीसोबत वादविवाद केला आणि तिच्यावर कैचीने हल्ला करून तिची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. व आरोपीला अटक केली. दरम्यान, पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.







