Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनचा 2014 मध्ये संपर्क; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या गंभीर दाव्याने राजकारणात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 20 December 2025, 18:04
former Chief Minister Prithviraj Chavan

मुंबई: अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गुप्त कागदपत्रे आणि पुरावे सार्वजनिक झाल्यामुळे जागतिक राजकारणासह आता भारतातही वादाचे मोहोळ उठले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात धक्कादायक दावे केले असून, या प्रकरणाचे धागेदोरे भारतीय नेत्यांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप केला आहे.

 

 मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जेफ्री एपस्टीन हा केवळ एक उद्योगपती नसून तो इस्रायलचा गुप्तहेर असल्याचे समोर येत आहे. चव्हाण यांनी दावा केला की,  2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपस्टीन यांचा संपर्क आला होता. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सल्लागाराला मोदींची भेट हवी होती आणि त्यासाठी एपस्टीनची मध्यस्थी वापरण्यात आली होती. त्या सल्लागाराशी मोदींचा काय संबंध होता? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या ईमेलमध्ये भारताचे विद्यमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख असल्याचा दावाही चव्हाणांनी केला आहे. हरदीप सिंग पुरी हे त्यावेळी अमेरिकेतील राजदूत होते.  या संदर्भात मोदी सरकार आणि संबंधित सल्लागाराचे नेमके काय संबंध होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 30 वर्षांचा डेटा आणि 3 लाख कागदपत्रे

एपस्टीन प्रकरणाचा इतिहास सांगताना चव्हाण म्हणाले की, 1995-96  पासून हे काळे साम्राज्य सुरू होते. ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या उच्च सुरक्षा तुरुंगात एपस्टीनचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेतील जनतेच्या दबावामुळे ट्रम्प प्रशासनाला नाइलाजाने ही कागदपत्रे प्रसिद्ध करावी लागली.

या दिग्गजांचा समावेश

अमेरिकेच्या न्याय विभागाने तब्बल 3 लाख कागदपत्रे आणि 2.5 जीबीपेक्षा जास्त डेटा सार्वजनिक केला आहे. यामध्ये सुमारे  3500 फाईल्स असून त्यात ईमेल्स, पत्रे, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटोंचा समावेश आहे. यात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप स्टार मायकल जॅक्सन, प्रिन्स अँड्र्यू आणि हॉलिवूड अभिनेता ख्रिस टकर यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. काही फोटोंमध्ये बिल क्लिंटन पार्टी करताना आणि स्विमिंग पूलमध्ये महिलांसोबत दिसत आहेत.

एपस्टीन हा अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांने उच्च पदावरील बड्या नेत्यांना त्यांचा देह विक्रय केला. यामुळे त्याच्यावर अनेक बालिकांनी  फौजदारी गुन्हे दाखल केले होते. एपस्टीनचा मृत्यू न्यूयॉर्कमधील अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगात ऑगस्ट 2019 मध्ये झाला होता. तेंव्हा त्याने गळफास लावून  आत्महत्या केली की या मोठ्या नेत्यांनी आणि उद्योजकांनी त्याचा खून केला? याचं स्पष्टीकरण अजूनही समोर आलेलं नाही.

एफबीआयने एपस्टीनच्या मॅनहॅटन येथील घराची झडती घेतली असता मिळालेले फोटो, तुटलेले दरवाजे आणि त्याच्या ‘लिटल सेंट जेम्स’ या खाजगी बेटावरील पार्ट्यांचे पुरावे या संचामध्ये आहेत. तथापि, काही संवेदनशील माहिती काही कारणास्तव अद्यापही राखून ठेवण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एपस्टीनसारख्या गुन्हेगाराच्या संपर्कात भारतीय यंत्रणा किंवा नेते कसे आले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अमेरिकेतील हा ‘डेटा बॉम्ब’ येणाऱ्या काळात भारतीय राजकारणावर नेमका काय परिणाम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Pune News

Pune News : हडपसर येथे 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी ठेवलेली शेळी, बोकडं चोरीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.