Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai : धक्कादायक! स्कूल बसने आजी-नातीला चिरडले, कुशीतील 9 महिन्याचं बाळ चाकाखाली, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 January 2026, 17:39

Mumbai : मुंबई: दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरात मंगळवारी दुपारी एक अत्यंत दुःखद अपघात घडला. शाळेतून नातीला घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या एका महिलेला स्कूल बसने धडक दिली. या अपघातात महिलेच्या कुशीत असलेल्या 9 महिन्यांच्या बाळाचा बसच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 12.23 वाजता कुलाबा येथील जे.बी. सोमाणी शाळेची बस विद्यार्थ्यांना उतरवत होती. त्या वेळी संबंधित महिला आपल्या नातीला बसमधून उतरवून घेत होती. तिच्या कुशीत लहान बाळ होते आणि नातीचा हात धरून ती रस्ता ओलांडत होती. त्याच क्षणी बस पुढे सरकली आणि महिलेला जोरदार धडक बसली.

धडकेनंतर महिला, बाळ आणि शाळकरी मुलगी रस्त्यावर कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. बसचे पुढील चाक महिलेकडे व बाळाकडे गेल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाला. महिला आणि मुलगी या दोघींनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती मिळताच खेतवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्कूल बस चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण तपासले जात असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू आहे.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे खेतवाडी परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा बस चालकांनी आणि संबंधितांनी अधिक काळजी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांना उतरवताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24

धक्कादायक! संशयाच्या भुताने सुखी संसार राखला; पत्नीची हत्या करताना चिमुकलीने पाहिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी बापाने लेकीलाही…

Tuesday, 7 April 2026, 17:19

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50
Next Post
Ajit Pawar Death Case

Ajit Pawar Death: अजितदादांचा 'अंतिम प्रवास' निश्चित! उद्या सकाळी ११ वाजता बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान, असं असेल संपूर्ण नियोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.