Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पूर्णेकरांच्या जीवाची किंमत 17 लाख?” एकनाथ शिंदेंनी मांडवली करायला माणूस पाठवला; विजेता पूर्णेकरांच्या आरोपांनी नवा वाद

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 October 2026, 9:23

ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला 28 दिवस उलटूनही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी मंगळवारी ठाण्यात आंदोलन केले. माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी निघाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला आधीच ताब्यात घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसेचे नेते पोलीस ठाण्यात दाखल झाले. पूर्णेकर कुटुंबीयांनीही पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले. मध्यरात्रीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

दरम्यान, घोडबंदर रोडवरील मानपाडा, कापूरबावडी आणि बाळकुम नाका परिसरात समर्थकांनी रास्ता रोको केला. काही ठिकाणी टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. यामुळे कोलशेत रोडसह मुंबई-ठाणे ते गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास बळाचा वापर करून आंदोलकांना रस्त्यावरून हटवले. मानपाडा परिसरात पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या परिस्थिती शांत असून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी 17 लाख रुपयांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. विजेता पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “17 लाखांचा विषय पुढे करून आम्हाला विकत घेता येईल, असा त्यांचा समज होता. 17 लाखांचा वकील असल्याचेही सांगितले जात होते. पूर्णेकर कुटुंब 17 लाखांत विकले जाईल, असे त्यांना वाटले. पूर्णेकर कुटुंबाच्या जीवाची किंमत त्यांनी 17 लाख रुपये लावली. एवढ्या रकमेत मांडवली होईल, असा त्यांचा समज होता. शिंदे साहेबांनीच त्याला मांडवली करण्यासाठी पाठवले होते,” असे विजेता पूर्णेकर यांनी म्हटले.

दरम्यान, पूर्णेकर यांना न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ठाण्यात सर्वपक्षीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गुंगीच्या गोळ्या देऊन लुटायचा! पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना बनवायचा टार्गेट, सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 28 October 2026, 9:50

पुणे पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! हर्षदा देशमुख आघाडीवर, स्मिता जाधव किती मतांनी पिछाडीवर? वाचा

Wednesday, 28 October 2026, 9:39

“पूर्णेकरांच्या जीवाची किंमत 17 लाख?” एकनाथ शिंदेंनी मांडवली करायला माणूस पाठवला; विजेता पूर्णेकरांच्या आरोपांनी नवा वाद

Wednesday, 28 October 2026, 9:23

पुण्यात पाणीपुरवठ्याचा मोठा खोळंबा! गुरुवारी पाणी बंद, कोणत्या भागांना बसणार फटका? वाचा

Wednesday, 28 October 2026, 8:59

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 28 October 2026, 8:53

पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी छापा टाकला अन्

Wednesday, 28 October 2026, 8:34
Next Post

पुणे पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! हर्षदा देशमुख आघाडीवर, स्मिता जाधव किती मतांनी पिछाडीवर? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp