Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: माणुसकीला काळिमा! जेवण आणि अभ्यासाच्या कारणावरून 9 वर्षांच्या मुलाचा अमानुष छळ; नराधम पित्यावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 12:27

Crime News: मुंबई : मुंबई येथील मीरा रोड परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 33 वर्षांच्या पित्याने आपल्याच 9 वर्षांच्या निष्पाप मुलाला गरम इस्त्रीचे चटके देऊन अमानुषपणे मारहाण (Inhuman beating) केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भाईंदरमधील नवधर पोलीस ठाण्यात आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले आहे. तो आपल्या लहान मुलासोबत मीरा रोड भागात वास्तव्यास आहे. या मुलाला त्याने शिक्षणासाठी मथुरा-वृंदावन येथील एका निवासी शाळेत म्हणजेच बोर्डिंगमध्ये ठेवले आहे. 20 डिसेंबर 2025 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा मुलगा सुट्टीसाठी आपल्या घरी आला होता. याच काळात वडिलांनी त्याला अत्यंत क्रूर वागणूक दिली. मुलगा जेवण व्यवस्थित करत नाही किंवा अभ्यास करत नाही अशा अगदी शुल्लक कारणांवरून वडिलांनी त्याला राग भरला. इतकेच नाही तर रागाच्या भरात त्यांनी मुलाला घाणेरड्या शिव्या दिल्या आणि गरम इस्त्रीने त्याच्या शरीरावर चटके दिले.

सुट्टी संपल्यानंतर जेव्हा मुलगा पुन्हा आपल्या शाळेत परतला, तेव्हा तेथील शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला. मुलाच्या अंगावरील जखमा पाहून शिक्षकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी घाबरलेल्या मुलाने वडिलांनी केलेली ही अमानुष कृत्य शिक्षकांना सांगितली. ही बाब समजताच शिक्षकांनी तातडीने मुलाच्या आजीशी संपर्क साधून त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने हा विषय पोलिसांपर्यंत पोहोचला. नवधर पोलिसांनी 23 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुलाची फिर्याद नोंदवून घेतली. स्वतःच्याच मुलाचा छळ करणाऱ्या या निर्दयी पित्याविरुद्ध आता कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25
Next Post

Local Body Election : नगर पंचायतीत आता 'एकच हुकूमी एक्का'! छोट्या शहरांमधील राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp