Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bribe News: खाकी डागाळली! 3 लाखांच्या लाचेसाठी पोलीस स्टेशनमध्ये सेटलमेंट; एसीबीच्या छाप्यात 6.34 लाखांची रोख जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 February 2026, 18:16
Bribe News: Khaki stained! Settlement in police station for bribe of 3 lakhs; Cash worth 6.34 lakhs seized in ACB raid

मुंबई : राज्यातील विविध खात्यांतील भ्रष्टाचाराच्या (Bribe News) घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच आता मुंबईतून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाड येथील कुरार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Crime News) सुनावली आहे. (Mumbai News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, एका फिर्यादी वकिलाविरोधात दाखल होऊ घातलेल्या फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारीवर गुन्हा नोंद करू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार बुधवारी कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात आधीच 2 लाख रुपये स्वीकारण्यात आल्याचे समोर आले आहे. उर्वरित 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान पोलिसांच्या केबिनची झाडाझडती घेण्यात आली असता तब्बल 6 लाख 34 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम नेमकी कशासाठी होती, याचा तपास एसीबीकडून सुरू आहे.

एसीबीने न्यायालयाकडे अधिक सखोल चौकशीसाठी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत 23 तारखेपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे व्यवहार केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांत विविध खात्यांतील लाचखोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकालाही लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. अशा घटनांमुळे “पैसे दिल्याशिवाय काम होत नाही” ही भावना अधिक बळावू लागली आहे.

दरम्यान, कुरार पोलीस ठाण्यातील या कारवाईनंतर पोलीस दलातील प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एसीबीने भ्रष्टाचाराविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा राजीनामा! अ‍ॅक्सिस बँकेतील 'त्या' मोठ्या पदाला ठोकला रामराम; शेअर केली अत्यंत भावनिक पोस्ट.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.