Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर लवकरच लागणार MDR शुल्क? वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 November 2026, 11:01

मुंबई : दिवाळीनंतर यूपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) निवडक मर्चंट यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क लागू करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित नियमानुसार, २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र, हा नियम नेमका कोणत्या तारखेपासून लागू होणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

एनपीसीआयने यापूर्वी १५ ऑक्टोबरपासून निवडक यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क लागू करण्याची तयारी केली होती. मात्र, सणासुदीचा काळ लक्षात घेऊन हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

१३ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात एनपीसीआयने निवडक पर्सन-टू-मर्चंट (P2M) यूपीआय पेमेंटवर दिवाळीनंतर लगेच शुल्क लागू केले जाईल, असे म्हटले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार, याची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अद्याप नवीन तारीख जाहीर झालेली नसल्याने व्यापारी आणि ग्राहकांचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

एनपीसीआयने १५ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र मर्चंट पेमेंटवर ०.४ टक्के MDR शुल्क आकारले जाऊ शकते. या शुल्काची कमाल मर्यादा ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा ७५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटसाठी लागू असेल.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यापाऱ्याने यूपीआयद्वारे एक लाख रुपयांचे पेमेंट स्वीकारले, तर ०.४ टक्के दराने ४०० रुपये शुल्क होईल. मात्र, कमाल मर्यादेमुळे व्यापाऱ्याला ३०० रुपयेच शुल्क द्यावे लागेल.

काही विशिष्ट श्रेणींमधील व्यवहारांसाठी स्वतंत्र शुल्करचना प्रस्तावित आहे. रेल्वे, टेलिकॉम, विमा आणि इंधन यांसारख्या श्रेणींमध्ये २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र पेमेंटवर ५ रुपयांचे निश्चित शुल्क आकारले जाऊ शकते.

तर म्युच्युअल फंड, शेअर्स आणि स्टॉक ब्रोकरशी संबंधित पेमेंटवर ०.०२ टक्के MDR दर प्रस्तावित आहे. या व्यवहारांसाठीही कमाल शुल्क मर्यादा ३०० रुपये असेल.

MDR शुल्काबाबत महत्त्वाची बाब म्हणजे हे शुल्क ग्राहकांकडून नव्हे, तर पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्याकडून आकारले जाते. त्यामुळे प्रस्तावित नियमानुसार ग्राहकांना यूपीआय पेमेंट करताना स्वतंत्रपणे MDR शुल्क द्यावे लागणार नाही.

पर्सन-टू-पर्सन (P2P) म्हणजेच दोन व्यक्तींमध्ये होणाऱ्या पैशांच्या हस्तांतरणावर MDR शुल्क लागू होणार नाही. कुटुंबीयांना पैसे पाठवणे, मित्रांसोबत बिलाची रक्कम विभागून देणे किंवा स्वतःच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करणे, अशा व्यवहारांवर पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारले जाणार नाही.

त्यामुळे प्रस्तावित बदलांचा परिणाम मुख्यतः निवडक व्यापारी व्यवहारांवर होणार असून, सामान्य व्यक्तींमधील यूपीआय पैशांच्या देवाणघेवाणीवर त्याचा परिणाम होणार नाही. मात्र, नियमांच्या अंमलबजावणीची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

उरुळी कांचन येथे घराजवळ उभी केलेली पिकअप गाडी किराणा मालासह चोरीला; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp