Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घटनेनुसार शरद पवार हे राष्ट्रवादीचे मेंबर नाहीत; मग ते अध्यक्ष कसे? अजित पवार गटाच्या वकीलांचा युक्तीवाद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 31 January 2024, 17:53

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणे बदलली. राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीमध्ये महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पटेल, तटकरे यांची नेमणूक देखील निवडणूक न घेता झाली आहे. त्यामुळे घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत. पक्षाचे सदस्यही नसताना ते अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला आहे. या युक्तिवादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली होती. शरद पवार हे अध्यक्ष होते. स्टेट कमिटीची निवडणूक घेण्यात येणार होती. सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी शरद पवारांनी निवडणूक न घेताच सगळ्यांची नेमणूक केली, असे मत तुळजापूरकर यांनी व्यक्त केला.

पक्षामध्ये मतभेद आहे, कोणत्या गटाला किती पाठिंबा आहे आणि कोणता गट खरी राष्ट्रवादी आहे याचा वाद आहे. प्रदेशाध्यक्ष नेमकं कोण आहे हा मुद्दा नाही. पण जी व्यक्ती बोलते की मी प्रदेशाध्यक्ष, खजिनदार आहे, ते पार्टीच्या संविधानानुसार सह्या करू शकतात का? पक्षाच्या या कमिटी फक्त पेपरवर लिहिल्या आहेत. शिवसेनेच्या बाबतीत संविधानाचा विषय येतो. आपल्याला त्यात वेळ घालवायचा नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनुसार ३ गोष्टी बघायच्या आहेत. संविधान, विधिमंडळ बहुमत आणि संविधानिक बहुमत. घटना नेमकी काय आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे.

पार्टीमध्ये बहुमत असेल तर ते पार्टीच्या स्ट्रक्चरनुसार असले पाहिजे आणि दुसरे म्हणजे विधिमंडळ बहुमत पाहणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून विधिमंडळ पक्षाचे बहुमत सिद्ध करता आले नाही. १५ सप्टेंबर रोजी घोषणा केली की शरद पवार यांनी कार्यकारिणी जाहीर केली आणि इतर पदेदेखील जाहीर केली. घटनेनुसार त्यांना ही पदे जाहीर करणे बरोबर आहे का? ते या पार्टीचे मेंबर आहेत का? आणि जर नसतील मग ते अध्यक्ष कसे होऊ शकतात? शरद पवार यांनी एकट्यांनी पत्रकार परिषद घेऊन कसे ठरवले की आम्हाला सरकारमध्ये जायचे नाही. राष्ट्रवादीच्या घटनेत कुठे लिहिले आहे की आमदारांनी शिवसेनेबरोबर जाऊ नये किंवा भाजपबरोबर सरकार बनवू नये? तुम्हीच २०१४ ला भाजप सरकारला पाठिंबा दिला होता, असे म्हणत तुळजापूरकर यांनी टीका केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50
Next Post
Varanasi court permits Hindu side to offer prayers in Gyanvapi mosque cellar

ज्ञानवापी मशीद तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.