Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vasubaras 2025: देवतांची कृपा मिळवण्यासाठी वसुबारसेला पूजा कशी करावी? जाणून घ्या महत्व आणि योग्य पूजा विधी

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 October 2025, 10:11

पुणे: दिवाळीच्या (Vasubaras 2025) मंगलमय उत्सवाची सुरुवात ‘वसुबारस’ या सणाने होते. द्वादशीला साजरा होणारा हा दिवस ‘गोवत्स द्वादशी’ म्हणूनही ओळखला जातो. यंदा, शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025 रोजी वसुबारस साजरी होत आहे.

वसुबारस म्हणजे काय?

गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे वासरू’ या दिवशी धन आणि समृद्धीच्या आगमनासाठी वासरासह असलेल्या गायीची म्हणजेच सवत्स धेनूची पूजा करण्याची परंपरा आहे.

गायीची पूजा का करतात?

 

हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण आणि सर्वोच्च स्थान आहे.  तिला ‘गोमाता’ मानले जाते. या पूजनामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत:

  • 33 कोटी देवतांचे निवासस्थान: धार्मिक मान्यतेनुसार, गायीच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे गायीची पूजा करणे म्हणजे एकाच वेळी सर्व देवतांची पूजा करण्यासारखे आहे.
  • कामधेनूची उत्पत्ती: पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून ‘कामधेनू’ या दिव्य गायीची देखील उत्पत्ती झाली. कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी मानली जाते, म्हणून तिची पूजा करणे शुभ मानले जाते.
  • समृद्धी आणि कल्याणाची कामना: ‘वसु’ म्हणजे धन/संपत्ती. त्यामुळे या दिवशी गाय-वासराची पूजा केल्याने घरात समृद्धी, शक्ती आणि तेजाचे प्रतीक ‘वसु’ येते, अशी श्रद्धा आहे. विवाहित स्त्रिया आपल्या मुला-बाळांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत करतात.
  • कृतज्ञता व्यक्त करणे: गाय ही भारतीय कृषी संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. ती दूध,  शेण आणि गोमूत्र यांच्याद्वारे समाजाला पोषण आणि उपयुक्तता प्रदान करते. तिच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसला तिची पूजा केली जाते.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैसर्गिक फायदे:

    • जमिनीसाठी संजीवनी:  फिनोल, नायट्रोजन, फॉस्फरस आणि अमोनिया यांसारखी नैसर्गिक संयुगे गाईच्या शेणात असतात. ज्याचे शेतीसाठी अनेक फायदे आहेत. शेणातील जंतुनाशक गुणधर्मांमुळे वातावरण शुद्ध राहते आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळते.
    • गोमूत्राचे औषधी गुणधर्म: आयुर्वेदामध्ये गोमूत्राला ‘सर्वरोग निवारक’ औषध मानले जाते. कारण यात  70 हून अधिक उपयुक्त घटक आढळतात. जे अनेक आजार बरे करतात.

पूजेची पद्धत:

वसुबारसच्या दिवशी घरातील स्त्रिया उपवास करतात. गायीला स्वच्छ स्नान घालून तिच्या अंगावर नवी वस्त्रे, हळद-कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण केली जातात. त्यानंतर तिची आरती केली जाते. नैवेद्यात मुख्यतः बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगाची भाजी आणि गोड पदार्थ (पुरणपोळी) अर्पण केले जातात. अनेक स्त्रिया या दिवशी गहू आणि मूग खाणे टाळतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते आणि दिवाळीच्या मंगलमय उत्सवाचा प्रारंभ होतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिक्षक मतदारयादीत ११ कथित बोगस नावे! शाळांच्या मुख्याध्यापकांनी नावे नाकारली; सोलापूर जिल्ह्यात ११ जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 20 October 2026, 16:18

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाला अभिजित दीपकेचा ब्रेक! बोलताना कंठ दाटला, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 15:43

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50
Next Post

मोठ षडयंत्र! "हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरातच योगा करावा, जिममध्ये ट्रेनर कोण ते आधी बघा", भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp