पुणे प्राईम न्यूज डेस्क: आजकाल स्मार्टफोन हा केवळ कॉल किंवा मेसेजसाठी वापरला जात नाही, तर बँकिंग, सोशल मीडिया, फोटोग्राफी, गेमिंग आणि ऑफिस कामासाठीदेखील तो आवश्यक झाला आहे. यामुळेच अनेकजण दरवर्षी नवीन फीचर्स असलेला मोबाईल घेतात आणि जुना मोबाईल विकून टाकतात. मात्र, जुना मोबाईल विकताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न घेतल्यास तुमचा वैयक्तिक डेटा दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतो आणि तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मोबाईल विकण्यापूर्वी ‘या’ ४ स्टेप्स जरूर फॉलो करा:
गुगल/जीमेल आयडी हटवा
मोबाईल विकण्यापूर्वी सर्वात पहिले तुमचा गुगल किंवा जीमेल अकाउंट लॉगआउट करा आणि पूर्णपणे हटवा. अन्यथा, नव्या युजरकडे तुमचा ईमेल, फोटो, कॉन्टॅक्ट्स, ड्राईव्ह आणि इतर महत्त्वाचा डेटा पोहोचू शकतो. हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते.
फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा
मोबाईलमधील गॅलरी, व्हॉट्सअॅप मीडिया आणि इतर वैयक्तिक फोल्डर्समधील फोटो व व्हिडिओ डिलीट करा. फक्त डिलीटच नव्हे, तर मोबाईलच्या स्टोरेजमधून संपूर्ण डेटा क्लिन करा, जेणेकरून तो पुन्हा रिस्टोअर होऊ शकणार नाही.
फॅक्टरी रीसेट करा
सर्व डेटा हटवल्यानंतर मोबाईलला एकदा फॅक्टरी रीसेट द्या. यामुळे मोबाईल पूर्णपणे ‘नव्यासारखा’ होतो आणि तुमचा कोणताही वैयक्तिक डेटा त्यात शिल्लक राहत नाही. हा महत्त्वाचा स्टेप अनेकदा दुर्लक्षित केला जातो.
विक्रीचा पुरावा ठेवा
तुम्ही मोबाईल दुकानात, मित्राला, किंवा अनोळखी व्यक्तीला मोबाईल विकत असल्यास, एखादा लिखित किंवा डिजिटल पुरावा ठेवा. भविष्यात मोबाईलचा गैरवापर झाल्यास तुम्ही जबाबदार धरले जाणार नाही याची खातरजमा करून घ्या.
“मोबाईल बदलणं ट्रेंड आहे, पण सुरक्षेची खबरदारी घेणं गरजेचं आहे! तुमची प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी या ४ स्टेप्स पाळा आणि कोणत्याही अडचणीपासून स्वतःला वाचवा.







