ZP Election : राज्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. २९ महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्व पक्ष जोर लावताना दिसत आहेत. पण याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेमक्या कधी लागणार, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (ZP Election)

डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात निवडणूक आयोग जिल्हा परिषदांचा कार्यक्रम जाहीर करेल, असा अंदाज आधी व्यक्त केला जात होता. मात्र तसं झालं नाही. आता मात्र सुप्रीम कोर्टाची डेडलाईन जवळ येऊन ठेपली आहे. अवघे २४ दिवस शिल्लक राहिले आहेत.
यातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्याव्याच लागतील. अन्यथा कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाल्याचं मानलं जाऊ शकतं.
या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आधीच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या आहेत, तर महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रियाही सध्या सुरू आहे.
आता उरतो तो मोठा प्रश्न जिल्हा परिषदांचा. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वीच घ्या, अन्यथा कोर्टाचा अवमान ठरेल,” असा स्पष्ट इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पुढील एक-दोन दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
एकंदरीत, सुप्रीम कोर्टाच्या दबावामुळे निवडणूक आयोगाला वेगाने निर्णय घ्यावे लागत असून, राज्यातील ग्रामीण राजकारणही लवकरच निवडणुकीच्या रणधुमाळीत शिरणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.







