नाशिक : मुलीसोबत बोलतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या किरकोळ संशयावरून राहुल संजय सरकटे (वय 30) या तरुणावर कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आले. या अचानक झालेल्या हल्ल्यात राहुल गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या हिंसक घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. या प्रकरणी 3 संशयित आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, अधिक तपास वेगाने सुरू आहे.

हल्ल्यानंतर या जखमी तरुणाची स्थिती नाजूक असून, त्याच्यावर वैद्यकीय देखरेख खाली उपचार सुरू आहेत.तसेच या हल्ल्यामुळे संबंधित परिसरात काही काळ मोठा तणाव आणि भीतीचे सावट पसरले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि शांतता टिकून राहावी यासाठी पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. कायद्याचा बडगा दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे.







