Breaking News: राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना पुण्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना घडली आहे. पुणे शहरातील चाकणमध्ये (Chakan Politics) शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभरात एकच चर्चा रंगली आहे. ठाकरे आणि शिंदे गटांनी नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरे (Manisha Gore) यांना अधिकृत पाठिंबा दर्शवला आहे. त्या शिंदे गटच्याउमेदवार असून, अर्ज दाखल करताना ठाकरे आणि शिंदे गटातील स्थानिक आमदार आणि पदाधिकारी एकत्र उभे दिसले. या निर्णयामुळे राजकारणात एक वेगळचं दृश्य पाहायला मिळणार आहे.

खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने स्थानिक राजकारणात या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येत सुरेश गोरेंना श्रध्दांजली म्हणून मनीषा गोरे ताई यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा- सोन्याच्या खाणीत भूस्खलन; 101 जणांचा मृत्यू, अनेक लोक अद्याप बेपत्ता
परंतु हा पाठिंबा केवळ नगराध्यक्ष पदापुरताच मर्यादित राहणार आहे असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नगरसेवकांच्या निवडणुकीत दोन्ही गट स्वतंत्रपणे लढणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे ही औपचारिक युती नसल्याचे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे स्थानिक आमदार बालाजी काळे यांनी केले आहे.






