ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियातील सिडनी (Terrorist Attack) येथील बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगभरात भीतीचे वातावरण आहे. एका ज्यू सणाच्या वेळी दोन हल्लेखोरांनी अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. या क्रूर हल्ल्यात 16 लोकांचा मृत्यू झाला, तर 42 जण जखमी झाले. ऑस्ट्रेलियन तपास संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले गुन्हेगार हे वडील आणि मुलगा असून दोघेही हल्लेखोर पाकिस्तानी वंशाचे असल्याचे तपास संस्थांनी ओळखले आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने केला जात आहे.

बीचवर अनेक मृतदेह व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे . ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले, तर दुसऱ्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्ला ज्यू समुदायाला लक्ष्य करून करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून हल्ला करण्यामागचा उद्देश नेमका काय होता? याचा तपास सुरु आहे.






