Chandrapur News: चंद्रपूर: माणूस रोजच्या जीवनात कितीतरी संकटांना सामोरा जातो, पण जेव्हा जीवावर बेतणारी वेळ येते तेव्हा प्रत्येक श्वास जड वाटू लागतो. त्या क्षणी भीती, अस्वस्थता आणि आठवणी यांचा एकच गोंधळ उडतो. सगळं संपणार असं वाटत असतानाच एखादी अनपेक्षित घटना घडते आणि जीव वाचतो. आपण सहलीला जाणार या उत्साहात असताना एक थरकाप उडवणारा क्षण डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. असाच एक अनुभव चंद्रपूरच्या 22 महिलांनी घेतला असून काही क्षण त्यांनी मृत्यूच्या अगदी सान्निध्यात घालवले आहेत.

हेही वाचा- पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारीची धांदल; अर्ज भरण्याची मुदत वाढवली
चंद्रपूर जिल्ह्यातील एका शहरातील योगा ग्रुपच्या 22 महिलांनी एकत्र पर्यटनाला जाण्याचं ठरवलं होतं. दोन दिवसांची सहल आनंदात पार पडली. परतीच्या प्रवासात मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वाना हाद्रवून टाकणारी होती. चिखलदारहून निघाल्यानंतर साधारण अर्ध्या तासात मडकी गावाजवळ ट्रॅव्हल्स थांबवण्यात आली. प्रवासादरम्यान बसमधील एका महिलेला उलटी झाल्यामुळे बस पुढे काही अंतरावर थांबवण्यात आली. त्या महिलेला सावरण्यासाठी काही महिला खाली उतरल्या. त्यांच्यासोबत चालकही गाडीतून उतरला.
थोड्याच वेळात चालक पाण्याची बाटली आणण्यासाठी गाडीच्या दिशेने गेला. त्यावेळी अचानक लक्षात आलं की वाहन हळूहळू पुढे निघून जात आहे. चालकाने गाडी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र उतार आणि वाहनाच्या वजनामुळे त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. धक्कादायक म्हणजे गाडी दरीच्या दिशेने हळूहळू जाऊ लागली. हा थरकाप उडवणारा हा क्षण महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू लागला. या प्रयत्नात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा सगळा थरार महिलांनी डोळ्यांसमोर पाहिला.
दरम्यान, वाहन दरीत न जाता पुढे जाऊन एका झाडाला धडकले. एका भल्या मोठ्या झाड्यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडी झाडाला धडकल्यानंतर बस थांबली आणि त्याच क्षणी सर्व महिला सुरक्षितपणे खाली उतरल्या. झाड नसते तर गाडी थांबलीच नसती आणि बस थेट दरीत कोसळली असती, असे प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितले. या घटनेत 22 महिला आणि एक मुलगी अशा 23 जण सुखरूप आहेत.
चंद्रपूरहून चिखलदऱ्याला गेलेल्या 26 सीटर ट्रॅव्हल्ससोबत ही घटना घडली. रविवार दुपारी चिखलदरा ते परतवाडा मार्गावर आडनदीजवळील वळणावर हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पण सर्व महिला सुखरुप घरी परतल्याने परिसरात सुखद वातावरण आहे.






