Vasai School Incident: वसई येथून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. वसईतील पूर्व परिसरात राहणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत (12-year-old girl death) झाला आहे. शिकक्षाने दिलेल्या कठोर शिक्षेमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेमुळे वसईत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना श्री हनुमंत विद्या शाळेत घटना घडली आहे. काजल गवड असे मृत विद्यार्थींनीचे नाव आहे. 8 नोव्हेंबर रोजी ती शाळेत साधारण 10 मिनीटे उशिरा पोहोचली. शाळेत प्रवेश करताच संबंधित शिक्षकाने काजल आणि इतर विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे ठेवले आणि शिक्षा म्हणून उठबश्या ( स्क्वॅट्स) करण्याचा आदेश दिला.
काजलने सांगितल्या प्रमाणे 100 उठबश्या पूर्ण केल्या परंतू शिक्षा पूर्ण करताच ती जमिनीवर कोसळली. . दुसऱ्याच दिवशी काजलची प्रकृती बिघडू लागली. तिला सुरुवातीला वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारत नसल्याने तिला नालासोपारा येथील विजय लक्ष्मी रुग्णालयात हलवण्यात आले. तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला पुढील उपचारांसाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. तीच्यावर उपचार सुरु असताना काल 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काजोलच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून शाळेवर आणि शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकलीच्या मृत्यूनंतर अनेक पालकांनी शिक्षकावर संताप व्यक्त केला.







