Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur : नाद करायचा नाय! बार्शीत ‘देवा भाऊंच्या’ शिलेदाराचा डंका; राऊतांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 23:18
Solapur

photo- social media

Solapur : जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली बार्शी नगरपालिका भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवली आहे. 2016 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मोठा विजय मिळवत त्यांनी नगरपालिका जिंकली होती. मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सुमारे 6 हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभेला बार्शीतून महाविकास आघाडीला मोठा लीड आणि विधानसभेला ठाकरे गटाचे दिलीप सोपल विजयी झाल्यामुळे यावेळी नगरपालिका निवडणूक खूपच चुरशीची ठरणार, हे आधीच स्पष्ट होतं. (Solapur)

 

अखेर या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी जोरदार कमबॅक केलं आहे. बार्शी नगरपालिकेत भाजप–महायुतीचे तब्बल 23 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपचे 17 आणि शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला 19 जागांवर समाधान मानावं लागलं असून त्यांना विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तेजस्विनी कथले यांनी 4639 मतांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. त्यामुळे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना बार्शीकरांनी स्पष्ट धक्का दिल्याचं चित्र आहे आणि शहरावर पुन्हा भाजपची सत्ता आली आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेंद्र राऊत यांनी आधी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आता नगरपालिका निवडणूक जिंकत आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत राऊत यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास आघाडीने 18-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. त्यावेळी रणवीर राऊत आणि राजेंद्र राऊत यांची गळाभेट आणि भावुक क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

नगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर बार्शीत राऊत समर्थकांनी मोठा जल्लोष केला. विजयानंतर बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला होता, पण बाजार समिती आणि नगरपालिका निवडणुकीत ती कसर भरून काढली. तालुक्यातील आणि शहरातील जनतेचे मनापासून आभार. रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करतो. आता सहापैकी सहा जिल्हा परिषद आणि 12 पैकी 12 पंचायत समित्या जिंकण्याचा आमचा निर्धार आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजेंद्र राऊत यांना फोन करून अभिनंदन केलं आहे. बार्शी नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आल्याबद्दल त्यांनी बार्शीकरांचे आभार मानले असल्याची माहिती मिळते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छल पुन्हा एकत्र येणार? व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Wednesday, 8 April 2026, 15:03

झाकीर खान आणि सौरभ द्विवेदीवर प्रेक्षक भडकले! राजपाल यादवच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न; अखेर अभिनेत्याने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:00
Pregnant wife beaten with belt for not fulfilling husband's 'demand' 'Otherwise, I won't let you have sex'

‘नाहीतर तुला नांदवणार नाही’ पतीची ‘ती’ मागणी पूर्ण केली नाही म्हणून गरोदर पत्नीला पट्ट्याने मारहाण

Wednesday, 8 April 2026, 14:58

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! पुरंदरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा; पाहा काय आहे प्रकरण? वाचा

Wednesday, 8 April 2026, 14:34
Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20
Next Post
MJP Job

MJP Job : महाराष्ट्रभर नोकरीची संधी! महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वयोमर्यादेतही सूट; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.