Rupali Thombare Patil on indurikar Maharaj : महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटिझन्सकडून ट्रोल करण्यात आलं. सोशल मिडियावर इंदुरीकर महाराजांवर मिम्स व्हायरल झालेत. ‘साधेपणाचा संदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा थाटामाटात का केला?’ अशी टीका काही जणांनी केली.

”लोकं माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर बोलताय”
त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी किर्तनाची एक क्लिप पोस्ट करत मनाला वेदना झाल्यात. आम्ही किती कष्ट केले याचा लोकं कधीच विचार करत नाही. आम्ही संसार कसा केला हे पण त्यांना माहीत नाही. मी आठ दिवस लेकरांना भेटत नव्हतो, आता लोकं इतके खाली गेले की माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर बोलत आहेत. कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही, त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे, म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे असं म्हणतं.
इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी इंदुरीकर महाराज यांना साथ दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहित महाराजांना “फेटा खाली ठेवू नका” असा संदेश दिला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे पाटील फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या, ” इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी…तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही… महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झालात. साहजिकच होणार… पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात. या सोशल मीडियाच्या विकृत छपरी, जे माणूस नावावर कलंक आहेत. यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, कीर्तन, भजनातून समाजातील माता, भगिनी, बंधूंसाठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे. अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे. त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका.







