Ratnagiri Kolhapur Highway Accident : रत्नागिरी : रत्नागिरीत आज सकाळी सुमारात एक भीषण अपघात घडला आहे. आंबाघाट परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस सुमारे 70 फुट दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी टळली आहे. (Ratnagiri Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये अंदाजित 50 प्रवासी होते त्यापैखी 7 ते 8 जणांना किरकोळ जखम झाली आहे. रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील चक्री वळणार हा अपघात घडला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचे मोठे नुकसान झाले. बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती साखरपा पोलीस ठाण्यात देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीतील बस बाहेर काढण्याचे कार्य सुरू असून घटनास्थळाचा पंचनामा आणि पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपासानंतरच याबाबत अधिक माहिती मिळणार आहे.







