Rashi Transit: ज्योतिषशास्त्रात छायाग्रह मानला गेलेला केतू हा अचानक घडणाऱ्या गोष्टी आणि वैराग्याचा कारक आहे. केतूचे राशीतील किंवा नक्षत्रातील बदल ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. सन 2026 हे वर्ष सुरू होताच, जानेवारी महिन्यात केतू एक महत्त्वपूर्ण नक्षत्र परिवर्तन करणार आहे. या बदलामुळे अनेक लोकांच्या जीवनात मोठे आर्थिक बदल आणि सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

पंचांगानुसार, 25 जानेवारी 2026 रोजी केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्रातील दुसऱ्या चरणातून पहिल्या चरणात प्रवेश करेल. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, मार्च 2026 पर्यंत प्रभावी राहणाऱ्या या काळात अनेकांच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. तसेच जुने भावनिक दुरावे कमी होतील आणि अनपेक्षितरित्या आर्थिक संधी समोर येतील. विशेष म्हणजे, या नक्षत्र संक्रमणाचा प्रभाव तीन राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे.
या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे. त्यांना अचानक धनलाभ होऊन अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल आणि खर्चावर नियंत्रण राहील. वृषभ राशीसाठी हा काळ आर्थिक चमत्कार घडवणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील, जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. तर वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात प्रगतीची दारे खुली होतील. जुन्या कर्जातून मुक्तता मिळून आर्थिक स्थिती सुधारेल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.





