Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rahul Kul: मराठा तरुणांसाठी मोठी मागणी! इरादा पत्र आणि व्याज परतावा तातडीने द्या; आमदार राहुल कुल यांचा विखे पाटलांच्या बैठकीत आग्रह

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 22:43
Rahul Kul: Big demand for Maratha youth! Immediately issue letter of intent and interest refund; MLA Rahul Kul urges in Vikhe Patil's meeting

पुणे: मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी (Rahul Kul) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेली इरादा पत्रे आणि व्याज परतावा वेळेत देण्यात यावा, अशी ठाम मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी केली आहे. जलसंपदा मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे 10 डिसेंबर रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले. (Pune News)

 

या बैठकीत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजातील अडचणी आणि विविध प्रलंबित योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राहुल दादा कुल म्हणाले की, 9 ऑक्टोबर 2025 पासून महामंडळाकडून पात्र लाभार्थ्यांना इरादा पत्र देणे पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसारखी व्यावसायिक वाहने खरेदी करता न आल्याने अनेक मराठा तरुणांचे व्यवसाय थांबले असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर झाला आहे.

तसेच राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यात आलेला असतानाही महामंडळाकडून व्याज परतावा वेळेवर दिला जात नसल्याने अनेक लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रलंबित इरादा पत्रे आणि थकीत व्याज परतावा तातडीने वितरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार राहुल कुल यांनी आणखी काही गंभीर बाबींचा उल्लेख केला. महामंडळाचे 2013 पासून ऑडिट झालेले नसल्याने त्यामागची कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महामंडळाकडून विकसित करण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरची सद्यस्थिती तातडीने जाहीर करावी, असेही ते म्हणाले. मराठा तरुण-तरुणींसाठी उच्च शिक्षण कर्ज व व्याज परतावा तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी 1 ते 2 लाख रुपयांचे कर्ज व व्याज परतावा या ठरावांवरही तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी बैठकीत मांडली.

मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक होणे आवश्यक असल्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, नियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Next Post
Viral News: Couple's 'private moment' by stopping car on road cost them dearly; CCTV video recorded and went viral...

Viral News: रोडवर गाडी थांबवून 'खाजगी क्षण' घालवणं जोडप्याला पडलं महागात; CCTVमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड होऊन व्हायरल झाला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.