पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्याला (Pune Weather) गारठून टाकणाऱ्या थंडीचा जोर आज, १६ डिसेंबर रोजी काहीसा कायम असणार आहे. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असल्याने पुणेकरांना पहाटेच्या वेळी बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळेल.

सकाळी ७:३० वाजता शहरातील तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करावे. मात्र, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दिवसभर आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, त्यामुळे दुपारच्या वेळेस थंडीपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दिवसभर हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार आहे. दरम्यान, हवेची गुणवत्ता (AQI) २३४ (खराब श्रेणी) असल्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.







