पुणे: नागपूरमध्ये सुरू असलेल्या (Pune Politics) हिवाळी अधिवेशनाच्या (Operation Lotus) पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगरची चर्चा सध्या (Ajit Pawar) राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना (Rohit Pawar) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यात झालेल्या भेटीनंतर या चर्चांना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. (Maharashtra Politics)

‘ऑपरेशन लोटस’ची रणनीती अजित पवारांवर वापरणार
रोहित पवार यांनी दावा केला आहे की भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांना हाताशी धरले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून आपल्या मित्रपक्षांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी उदय सामंत यांचा वापर केला जात असल्याची चर्चा होती. आता हीच रणनीती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी वापरली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. (Marathi Batmya)
भाजपचा मुख्य फोकस फक्त मुंबई महानगरपालिका
पुण्यात माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील, अशी शक्यता कमी आहे. भाजपचा मुख्य फोकस फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुकीपुरता असून त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (Breaking News)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप आपल्या दोन्ही मित्रपक्षांना बाजूला सारेल, असा दावा रोहित पवार यांनी केला. त्यामुळे भविष्यात 2019 पूर्वीप्रमाणे भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी राजकीय लढत पाहायला मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
ऑपरेशन टायगर यशस्वी होईल असे वाटत नाही
ऑपरेशन टायगर यशस्वी होईल असे वाटत नसल्याचे सांगत रोहित पवार म्हणाले की, प्रत्यक्षात ऑपरेशन लोटस सुरू आहे. भाजपकडे मोठ्या प्रमाणात पैसा असून तो आमदार आणि खासदार फोडण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अलीकडील नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा दावा करत, अजित पवार यांच्या पक्षातील दोन नेत्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Marathi News)







