Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे NCRA ने शोधली ‘अलकनंदा’, पण ताऱ्यांची निर्मिती आकाशगंगेपेक्षा 30 पट अधिक

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 December 2025, 14:57

पुणे: पुणे (Pune News) येथील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी ‘अलकनंदा’ या नावाने ओळखली जाणारी एक अत्यंत जुनी वळणदार दीर्घिका शोधून काढली आहे. ही दीर्घिका इतकी दूर आहे की तिचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तब्बल 12 अब्ज वर्षांहून अधिक काळ लागतो, ज्यामुळे ती आजपर्यंत ज्ञात झालेल्या सर्वात प्राचीन दीर्घिकांपैकी एक ठरली आहे. विश्वनिर्मितीच्या सिद्धांतांमध्ये मोठे बदल घडवून आणणारा एक नवीन शोध लावला आहे. ही दीर्घिका बिग बँग् नंतर अवघ्या दीड अब्ज वर्षांनी तयार झाली आहे.

पीएच.डी. विद्यार्थीनी राशी जैन यांनी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोध लावला. हे संशोधन नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या डेटावर आधारित आहे. सुरुवातीच्या काळात दीर्घिका अविकसित आणि अस्तव्यस्त होत्या, असा जुना समज होता. मात्र, अलकनंदासारखी परिपूर्ण वळणदार रचना इतक्या कमी वेळेत तयार झाल्याचे पाहून तज्ज्ञांना दीर्घिका उत्क्रांतीच्या समजुतीवर पुनर्विचार करणे भाग पडले आहे.

‘अलकनंदा’ दीर्घिकेचा कोनीय आकार इतका लहान आहे की, ती दूरवरून पाहिले असता, तीन किलोमीटर अंतरावर ठेवलेल्या एक रुपयाच्या नाण्याइतकी छोटी दिसते. रचनेच्या बाबतीत ‘अलकनंदा’ आपल्या ‘मंदाकिनी’ आकाशगंगेशी साम्य दर्शवते. ही दीर्घिका देखील वळणदार आहे. तिच्या रचनेत मध्यभागी एक फुगलेला भाग आणि बाहेरच्या बाजूला दोन भुजा स्पष्टपणे दिसतात. या दीर्घिकेमध्ये ताऱ्यांची निर्मिती अतिशय जलद गतीने होत आहे.

संशोधकांच्या मते, दरवर्षी अंदाजे 63 सूर्यांइतक्या वस्तुमानाचे तारे येथे तयार होत आहेत, जे प्रमाण आपल्या आकाशगंगेतील निर्मितीपेक्षा 20 ते 30 पट अधिक आहे. या शोधामुळे सुरुवातीचे विश्व अपेक्षेपेक्षा अधिक प्रगल्भ आणि झपाट्याने विकसित होत होते, हे स्पष्टपणे सिद्ध झाल्याचे प्रा. वाडदेकर यांनी नमूद केले.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नूडल्स नव्हे, तर मालमत्तेचा वाद? 5 मृत्यूंच्या प्रकरणात व्हॉइस नोटचा मोठा खुलासा; तिघे ताब्यात

Sunday, 18 October 2026, 13:54

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 13:22

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21

शिरूरमध्ये सराफ दुकानात दोन महिलांकडून हातसफाईचा डाव! सव्वादोन लाखांची सोन्याची चैन लंपास

Sunday, 18 October 2026, 11:57

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

Sunday, 18 October 2026, 11:34
Next Post
Pune Crime

Pune Crime : पुण्यात 'भानामती'चा खेळ; बंद घरासमोर हळद-कुंकू, लिंबू-नारळ! संपूर्ण घटना CCTV मध्ये झाली कैद!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp