पुणे: पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित असलेल्या पुणे येथील मुंढवा जमीन घोटाळ्याला आता वेगळे वळण मिळाले आहे. पुण्यातील बहुचर्चित जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. मुख्य प्रमुख आरोपी शीतल तेजवाणीला पुणे पोलिसांनी अटक केली असून तिच्या अटकेमुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अमेडिया कंपनीने केलेला हा जमीन व्यवहार वादग्रस्त ठरला, कंपनीने 40 एकर सरकारी जमीन खरेदी केली होती. 1800 कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीसाठी अमेडिया कंपनीने केवळ 300 कोटी रुपये मोजले आणि मुद्रांक शुल्कही भरले नव्हते. दरम्यान, राज्यभरातून केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे जमीन खरेदीचा करार रद्द करत असल्याचे घोषित केले होते.
या व्यवहारात अनेक अनियमितता समोर आल्या आहेत. खरेदी करार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर 21 कोटी रुपयांचा भरणा पार्थ पवार यांनी अजूनही भरलेला नाही. दरम्यान, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







