पुणे: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे (Pune News) तालुक्यातील एका 30 वर्षीय (Pune Crime) तरुणीला लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या तरुणीचे लग्न पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राहणाऱ्या अमोल नावाच्या तरुणाशी रीतीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे सुमारे सहा महिने पती आणि सासरच्या मंडळींकडून तिला चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप तिने केला आहे. (Breaking News)

अनैतिक प्रेमसंबंध
तक्रारदार विवाहितेच्या म्हणण्यानुसार, काही काळानंतर तिला पती अमोलचे दामिनी नावाच्या 27 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. याबाबत तिने पतीला जाब विचारला असता, त्याने कोणतेही स्पष्टीकरण न देता उलट तिलाच त्रास देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान दामिनी नावाच्या तरुणीने अमोलकडे त्याच्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर तिने थेट विवाहितेलाच धमकी दिली. अमोलला सोडचिठ्ठी दे आणि माहेरी निघून जा, अन्यथा तुला पाहून घेईल, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. (Marathi News)
सासरचा त्रास असह्य
विवाहितेने आपल्या तक्रारीत सासू-सासऱ्यांनीही आपल्याशी वाईट वागणूक दिल्याचे म्हटले आहे. तू चांगली नाहीस, तुला बाहेर फिरायला पाहिजे, असे बोलून सतत वाद घालण्यात येत असल्याचा आरोप तिने केला आहे. सासरचा त्रास असह्य झाल्याने ती अखेर माहेरी परतली. त्यानंतर पतीने तिला दोन लाख रुपये माहेरहून घेऊन आल्याशिवाय घरी येऊ नकोस, अशी धमकी दिल्याचे तिने सांगितले.
मला तुमची मुलगी नको
दरम्यान, पती अमोल माहेरी आल्यानंतर त्याने विवाहितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली आणि मला तुमची मुलगी नको असून मला सोडचिठ्ठी हवी आहे, असे सांगितल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित 30 वर्षीय विवाहितेने चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून 12 डिसेंबर रोजी पती अमोल आणि त्याची प्रेयसी दामिनी यांच्याविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







